आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कच्चा लिंबू\'च्या प्रीमिअरला भावी पत्नीसोबत पोहोचला \'श्री\', मराठमोळ्या अंदाजात दिसल्या तारका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा चित्रपट शुक्रवारी (11 ऑगस्ट) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. स्पेशल मुलाचे संगोपन करणा-या स्पेशल आईबाबांची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. मनमीत पेम, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, सचिन खेडेकर, अनंत महादेवन यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी कौतुकाची थाप दिली आहे. प्रेक्षकसुद्धा चित्रपटाला पसंतीची पावती देत आहेत. शुक्रवारी या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रीमिअर सोहळा मुंबईतील पीव्हीआर येथे आयोजित करण्यात आला होता. प्रीमिअरला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.  
 
भावी पत्नीसोबत दिसला श्री अर्थातच शशांक केतकर
कच्चा लिंबूच्या प्रीमिअरला अभिनेता शशांक केतकर त्याची भावी पत्नी प्रियांकासोबत दिसला. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून शशांक श्री म्हणून सगळ्यांच्या परिचयाचा आहे. अलीकडेच दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच दोघांचे लग्न होणार आहे.
 
मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी..
शशांक आणि प्रियांका यांच्याव्यतिरिक्त मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी प्रीमिअरला उपस्थित होते.कच्चा लिंबूची टीम प्रसाद ओक, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम हे यावेळी हजर होते. याशिवाय नेहा जोशी, पूजा सावंत, शरद केळकर, प्रथमेश परब, अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी शुभदा खांडकेकर, कविता लाड, रोहिणी हट्टंगडी, पौर्णिमा तळवलकर, रवी जाधव यांची पत्नी मेघना जाधव, प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक, चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे सेठ, सिद्धार्थ चांदेकर, नटरंग फेम सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे आणि त्याची पत्नी, रमेश भाटकर, कोरिओग्राफर फुलवा खामकर, गायिका बेला शेंडे, तुषार दळवी, अशोक शिंदे, पुष्कर श्रोत्री, संगीतकार राहुल रानडे, शर्मिष्ठा राऊत, भार्गवी चिरमुलेसह अनेक मराठी कलाकार प्रीमिअरला आवर्जुन उपस्थित होते.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, प्रीमिअर सोहळ्याची खास झलक छायाचित्रांमध्ये... 
 
हेही वाचा... 

>> 'कच्चा' नव्हे रवी जाधव आहे मराठी इंडस्ट्रीचा 'पक्का लिंबू', सलग 5 चित्रपट हिट
>> 'कच्चा लिंबू' फेम मराठमोळ्या सोनालीचे हे PHOTOSHOOT पाहिलंय का तुम्ही!
>> कशी झाली होती मराठमोळ्या सोनालीची ‘दिल चाहता हैं’साठी निवड, वाचा खास गोष्टी
>> चला 'कच्चा लिंबू'च्या शूटिंग सेटवर, बघा फिल्मचे Behind The Scenes
>> चाळीशीनंतरही एवढी स्टायलिश आहे 'बच्चू'ची आई, पाहा 'So..Kul' फोटोज
>> हे आहे 'नटरंग', 'बीपी', 'बालगंधर्व'चा दिग्दर्शक रवी जाधवचे ऑफिस, बघा INSIDE PICS
>> सलमानची 'हीरोईन', प्रियांका चोप्राच्या आईने पाहिला 'कच्चा लिंबू', बघा स्पेशल स्क्रिनिंगचे PICS
>> जेवढ्या सोज्वळ तेवढ्याच बोल्ड आहेत मराठी तारका, बघा 13 टॉप अॅक्ट्रेसेसचा मादक अंदाज
 
बातम्या आणखी आहेत...