आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO & PICS : 'कच्चा लिंबू'चा 'स्पेशल' ट्रेलर लाँच, सोनालीचा दिसला क्लासिक लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अभिनेता प्रसाद ओकचा स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रवी जाधव यांचा पहिला चित्रपट, सिनेमाचा ब्लॅक अँड व्हाईट क्लासिक लूक, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर,  मनमीत पेम, अनंत महादेवन अशी तगडी स्टारकास्ट या कारणांमुळे ‘स्पेशल’ ठरलेल्या स्वरूप रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा ट्रेलर लाँचदेखील असाच स्पेशल साजरा झाला.

'कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी’ या ट्विटर हँडलद्वारे ‘ट्विटर लाइव्हच्या’ माध्यमातून लाइव्ह प्रक्षेपीत झाला, यावेळी चित्रपटातील कलाकार म्हणजेच रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मयुरेश पेम, अनंत महादेवन, उदय सबनीस, दिग्दर्शक प्रसाद ओक, छायाचित्रकार अमलेंदू चौधरी निर्माता मंदार देवस्थळी उपस्थित होते. साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सांगणारा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

रितेश देशमुखने केले कौतुक...
कच्चा लिंबू या सिनेमाचा ट्रेलर बघून अभिनेता रितेश देशमुखने सिनेमाच्या टीमचे कौतुक केले आहे. रितेशने ट्विट केले,  "काही ट्रेलर बघता ते चित्रपट नक्की बघायला हवा, असे मनापासून वाटतं. हा चित्रपट माझ्यासाठी त्यापैकीच एक आहे. गुड लक टीम!"

दुस-या स्लाईडवर बघा, 'कच्चा लिंबू'चा 'स्पेशल' ट्रेलर आणि सोबतच ट्रेलर लाँचची कलाकारांची छायाचित्रे आणि रितेश देशमुखचे ट्विट.... 
 
बातम्या आणखी आहेत...