आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली \'कान्हा\' फिल्मची टीम, यशासाठी घातले गणरायाला साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विहंग एंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या आणि अवधुत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ हा मराठी सिनेमा गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात दोन अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'कॉफी आणि बरंच काही' फेम अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि 'देऊळ बंद' सिनेमातील अभिनेता गश्मीर महाजनी हे दोन हॅण्डसम हंक या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाचा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तर 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौरी नलावडे या सिनेमात झळकणारेय. 'कान्हा' या सिनेमाच्या शीर्षकावरुन हा सिनेमा दहीहंडीवर आधारित असणार हे लक्षात येते. आपल्या सिनेमाला यश मिळावे ही प्रार्थना करण्यासाठी सिनेमाची टीम नुकतीच मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली होती. दिग्दर्शक अवधूत गुप्ते, अभिनेता वैभव तत्त्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे यांच्यासोबतच सिनेमाचे निर्माते यावेळी उपस्थित होते. सगळ्यांनी गणरायाकडे सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.
काय आहे फिल्मचे कथानक ?
गोपाळकाला, मुळात पाहिलं तर श्रावणमासात येणार हा एक सण, आपल्या लाडक्या कृष्णाला बालगोपाळांनी दहीहंडी फोडून दिलेली मानवंदना. पण गेल्या काही वर्षात यातला सण मागे पडला आणि जीवघेण्या इर्षेने या निरागस खेळात प्रवेश केला आणि इर्षा होती जास्तीत जास्त थरांचा मानवी मनोरा लावून सगळ्यात उंच दहीहंडी फोडण्याची. साहजिकच ह्या ईर्षेचा फायदा घेतला काही राजकीय लोकांनी. प्रत्येक थरागणिक पैसे वाटू जाऊ लागले. लाखो रुपयांची बक्षिसे वाटली जाऊ लागली. मोठमोठाले मंडप उभारून, सेलिब्रिटीना आवताण धाडून या सणाला इव्हेंटचं स्वरूप देण्यात आलं आणि ह्या सर्व झगमगाटात दह्या दुधाच्या प्रसादाबरोबरच सच्चा गोविंदा मागे पडला. दहिहंडीचा थरार बघता बघता गोविंदाच्या जीवावर बेतायला लागला ज्यात अनेक गोविंदा झाले तर काहींचा दुर्दैवी मृत्युही झाला. गोविंदांच्या जीवाची हिच सुरक्षा लक्षात घेऊन न्यायालयाने या उत्सवावर आणि यात रचल्या जाणा-या थरांच्या संख्येवर बंधने आणली. या मुद्यावर अनेक चर्चा झाल्या. त्याचसोबत गोपाळकाल्याला साहसी खेळाचा दर्जा मिळावा म्हणून पुन्हा त्याच न्यायालयात याचिकाही दाखल केल्या गेल्या. गोविदांची सुरक्षा महत्त्वाची की सण उत्सव महत्त्वाचा ? पारंपरीक सणाचं स्वरूप योग्य की त्याला आलेलं इव्हेंटचं स्वरूप योग्य ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. याच प्रश्नांतून ‘कान्हा’ चित्रपटाच्या कथेचा जन्म झाला. या सर्व प्रकरणात या सणाचा झालेला खेळखंडोबा आणि त्या अनुषंगाने या खेळात चोरपावलाने शिरलेलं राजकारण, यात भरडले जाऊन एकमेकांसमोर उभे ठाकलेले मल्हार आणि रघू यांची गोष्ट प्रेक्षकांना ‘कान्हा’ मधून बघायला मिळणार आहे.
अलीकडेच या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रंगला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, कान्हा या सिनेमाच्या म्युझिक लाँच इव्हेंटची खास झलक आणि सोबतच जाणून घ्या सिनेमाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...