आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shankar Mahadevan, Sachin Pilgaonkar Starer Katyar Kaljat Ghusali Official Trailer Released

सांगीतिक मेजवानी देणा-या भव्यदिव्य ‘कट्यार काळजात घुसली\'चा Trailer लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर स्टारर ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी लाँच करण्यात आला. 40 वर्षे रंगभूमीवर गाजलेले 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य सुबोध भावे पेलतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन करण्यासोबत तो स्वतः भूमिकाही करतो आहे.
पंडितजींच्या भूमिकेतील शंकर महादेवन, खाँसाहेबांची भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

येत्या दिवाळीत म्हणजेच 12 नोव्हेंबरला पाडव्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार असून सांगीतिक मेजवानी देणारा भव्यदिव्य, देखणा सिनेमापा हण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणारेय.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या सिनेमाचा ट्रेलर...