आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : डॅशिंग अंदाजात परतली आहे अगडबम \'नाजुका\', बघा \'माझा अगडबम\'चा Trailer

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अगडबम' या चित्रपटातून धमाल उडवून दिल्यानंतर अभिनेत्री तृप्ती भोईर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'अगडबम'नंतर 'अगडबम पार्ट 2' करण्याचे आव्हान पुन्हा एकदा तृप्ती भोईरने स्वीकारले आहे. निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेतून तृप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रेसलिंगच्या रिंगमध्ये WWF चॅम्पिअन आणि नाजुका यांच्यातील दमदार सामना प्रेक्षकांना या चित्रपटात बघता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यातील नाजुकाचा हटके अंदाज लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने नाजुकाच्या पतीची भूमिका वठवली आहे.  शिवाय उषा नाडकर्णी यांचीही महत्त्वाची भूमिका यात आहे. 'माझा अगडबम' हे या चित्रपटाचे नाव आहे.   

कठीण होता प्रवास.... 
या चित्रपटातील जाडजूड नाजुका साकारण्यासाठी तृप्ती भोईरने प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे. याविषयी ती म्हणते, ''तृप्ती भोईर ते नाजुका असा प्रवास खूपच कठीण होता. सिलिकॉनने बनवलेला वन पिस चेहरा म्हणजे अगदी खांद्यापर्यंत होता, ज्याच्या वजनाने माझे गाल अक्षरशः खेचले जायचे आणि अशा अवस्थेत मी सतत 47 दिवस रोज 12 तास शूट केले आणि त्या आधी तयार होण्यासाठी 4 ते 5 तास जायचे. पण मेकअप दादा अनिल प्रेमगिरीकर आणि त्याची कन्या रेणू प्रेमगिरीकर यांच्या अतिशय कठीण आणि सुंदर प्रयत्नाने अखेर नाजुकाचा गोंडस चेहरा मिळाला. हा चेहरा मिळवण्यासाठी मी 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 वेळा मेकअप केला. म्हणेज 10 वेळा नाजुकाच्या चेहऱ्यासाठी परीक्षा दिली आहे. त्यानंतर नाजुकाचे हे रुप समोर आले आहे."

चला तर मग पाहुयात, तृप्तीची 'नाजुका'च्या रुपातील छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर 'माझा अगडबम'चा ट्रेलर... 
बातम्या आणखी आहेत...