आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Mr.& Mrs.Sadachari Official Trailer Released

‘मि. अँड मिसेस सदाचारी’ Trailer रिलीज, डॅशिंग अंदाजात दिसतोय वैभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आशिष वाघ दिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वैभव तत्त्ववादीचा डॅशिंग अंदाज बघायला मिळतोय. वैभवसोबत प्रार्थना बेहरे मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणारेय. कॉफी आणि बरंच काहीनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणारेय.
कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणा-या आशिष वाघ यांनी ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर उत्पल आचार्य यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित झालेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट करण्यात आला आहे.
प्रार्थना आणि वैभवसह अभिनेता मोहन जोशी, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसादजावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौजही सिनेमात आहे. या सिनेमाचे कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ. ए. खान आणि सुभाष नकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणा-या कलाकारांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.
त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन आणि वी. हरीक्रिशनन यांनी अफलातून संगीत दिले आहे. सिनेमाची धमाकेदार पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. येत्या 19 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल, असे तरी ट्रेलर बघता म्हणता येईल. अॅक्शन-रोमान्स-इमोशन्सचा तडका सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, ‘मि. अँड मिसेस सदाचारी’च्या ट्रेलरची खास झलक...