आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Murder Mestri Team In Parel Post Office

OMG: मानसी,क्रांती चोरून वाचतायत कोणाची पत्रं?... Actress की गॉसिप गर्ल्स?..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-यांची पत्र वाचू नयेत, हा संस्कार आपल्यावर लहानपणीच झालेला असतो. पण जी गोष्ट करू नये असं सांगितलं जातं, तिचं करायची खोड आपल्या सगळ्यांना असते. दुस-याचं गुपित जाणून घ्यायला आपण उताविळ असतोच. आणि पोस्ट ऑफिसला आलेल्या वंदना गुप्ते, क्रांती रेडकर आणि मानसी नाईक यांचा हाच उद्योग चाललाय की काय?.. हा प्रश्न तुम्हांला त्यांचे फोटो पाहून पडला नाही तरच नवलं. आता अभिनेत्री तर गॉसिप गर्ल्स असतात, हे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण त्या दुस-यांची पत्र वाचण्याइतपत.. आणि पोस्ट ऑफिस पर्यंत पोहोचून वाचण्याइतपत त्यांची मजल जाईल?
खरं तर, मानसी नाईक, वंदना गुप्ते, क्रांती रेडकर आणि हृषिकेश जोशी स्टारर ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटामध्ये हृषिकेश जोशी लोकांची पत्र वाचणा-या पोस्टमनच्या भूमिकेत आहे. पण ह्या तिघी पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्या पत्रांकडे पाहत असताना त्यांचे एक्सप्रेशन्स जास्त बोलके दिसले.
आजकाल पोस्ट ऑफिस अस्तंगत होत चाललीयत. त्यामुळे चित्रपटात पोस्ट ऑफिसचा माहौल अनुभवलेल्या या कलाकारांना सिनेमासारखं पोस्ट ऑफिस आजच्या एन्ड्रॉइडच्या जमान्यात असतं का?.. हे पाहण्याची उत्सुकता होती. आणि त्या उत्सुकतेपोटी हृषिकेश जोशी, वंदना गुप्ते, क्रांती रेडकर आणि मानसी नाईक ही चौकडी पोहोचली परळ पोस्ट ऑफिसमध्ये. तिथे पोस्टमनचं काम कसं असतं, ते त्यांच्याकडूनच शिकून पत्यांनूसार पत्रांचं वर्गीकरण करायलाही ही मंडळी बसली. पण हृषिकेश जोशी सोडून तिनही अभिनेत्री आपल्या गप्पांमध्ये रंगल्या. एकमेकींना आपल्या हातात आलेली पत्र दाखवतं. आणि त्यावरून मग काम करता करता गप्पांचा फड कधी रंगायला वेळ थोडीच लागतोय.
सगळ्यात जास्त पोस्टाचं काम समरसून करत होता, तो हृषिकेश जोशी. त्याविषयी हृषिकेशला विचारल्यावर तो म्हणाला, “मी ह्या सगळ्या उपस्थित पोस्टमनकडून काम ,समजावून घेतलं, आणि मला आवडलंही... मी पोस्टमन असतो, तर मन लावून काम केले असते, हे नक्की. एक-एक पत्राचा पत्ता पाहून त्यानुसार पत्र व्यवस्थित लावून ठेवणे, वगैरे मी मन लावून केले असते. घराशी संबंध असलेला पण डिचॅस असलेला तो पोस्टमन असतो, असं म्हटलं जातं.”
हृषिकेशच्या वाक्याला दुजोरा देत वंदना गुप्ते म्हणाल्या, “अगदी बरोबर.. न्हावी आणि पोस्टमन ही दोन माणसे पूर्वी घराघरात बातम्या पोहोचवणारे असायचे.”
(सर्व फोटो- अजित रेडेकर)
पूढील स्लाइडवर वाचा, क्रांती रेडकरने काय पाहिले पत्रांमध्ये