आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक पत्कींचा मुलगा अवतरतोय सिल्व्हर स्क्रिनवर, मराठी फिल्मला मिळाला नवा हॅण्डसम हंक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
वंशिका क्रिएशन सोबत सहनिर्माते विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट 'वन्स मोअर' या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. फिल्म सिटी, मुंबई सोबत गोव्यातही चित्रीकरण करण्यात येणार आहे. वन्स मोअर  हा मराठीतील पहिलाच सिनेमा आहे ज्यात, जास्तीत जास्त व्हीएफएक्स तसेच ग्राफिक्स वापरले जाणार आहे. मराठीतील 2017 मधील सर्वात MOST AWAITED CINEMA म्हणून वन्स मोअरचे नाव आतापासूनच घेतले जातेय. कारण हा सिनेमा 'कर्म' या विषयावर भाष्य करणारा असल्याने 14व्या शतकातील काळ व वर्तमान काळ दाखविला जाणार आहे. 
 
या सिनेमाची कथा ईटीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेच्या लेखिका कालाय तस्मैय नमः फेम लेखिका श्वेता बिडकर यांनी लिहिली आहे. आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजविले अभिनेते नरेश बिडकर यांच्या खडतर मेहनतीने त्यांच्याच दिग्दर्शनात वन्स मोअरची निर्मिती होत आहे. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की या सिनेमाद्वारे अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. आशुतोष यापूर्वी आपल्याला छोट्या पडद्यावर दिसला आहे. मेंदीच्या पानावर आणि दुर्वा या मालिकांमध्ये आशुतोषने अभिनयाची छाप उमटवली आहे. आता या सिनेमाद्वारे तो फिल्ममध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्यासोबत आपल्या नृत्याने अवघ्या महाराष्ट्राची मन जिंकणारी अभिनेत्री व नृत्यांगना धनश्री पाटील स्क्रिन स्पेस शेअर करणारेय. 
 
वन्स मोअरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या सिनेमाचे सहनिर्माते असून त्यांची ही एक महत्वाची भूमिका या सिनेमात असणार आहे.  अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा तळवलकर व दिग्दर्शक नरेश बिडकर यांच्या ही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. 
 
जोधा अकबर, चेन्नई एक्सप्रेससारख्या बॉलिवूडपटांचे नृत्य दिग्दर्शक चिन्नी प्रकाश जी यांच्याकडे नृत्याची धुरा सोपविली आहे. तर हिंदी सिनेसृष्टीतील मातब्बर अशा संजय सिंग यांना छाया दिग्दर्शनाची जबाबदारी दिली आहे. या पिरियड फिल्मसाठी संगीताची बाजू भक्कमपणे सांभळण्याचे शिव धनुष्य विविध पुरस्कार विजेते शैलेंद्र बर्वे यांनी लीलया पार पाडली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, मराठी इंडस्ट्रीचा नवीन हॅण्डसम हंक आशुतोष पत्कीचे खास फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...