आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैराट'च्या रिलीजला दोन महिने पूर्ण, बघा पुण्याच्या झोपडपट्टीत कसे झाले होते फिल्मचे शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील शूटिंग सेटवर क्लिक करण्यात आलेला कलाकारांचा फोटो. - Divya Marathi
पुण्यातील शूटिंग सेटवर क्लिक करण्यात आलेला कलाकारांचा फोटो.
एन्टरटेन्मेंट डेस्कः संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या 'सैराट' या सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांवर कायम आहे. २९ एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही या सिनेमाविषयीची छोट्यातील छोटी गोष्ट जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर आहेत. म्हणूनच आज divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आले आहे या सिनेमाच्या शूटिंग सेटवरची नवीन छायाचित्रे. ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या ‘जनता वसाहत’ येथील असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले आहे.

सिनेमाच्या उत्तरार्धात नायक-नायिका हैदराबादमध्ये दाखल होतात. येथे काही गुंड आर्ची-परशावर हल्ला करतात, तिथेच आक्का (छाया कदम) ची एन्ट्री होते आणि ती दोघांनाही आपल्या झोपडपट्टीतील घरी घेऊन येते. येथे ती आर्ची-परशाला आश्रय देते. येथूनच दोघांच्या संसाराला सुरुवात होते, असे काहीसे कथानक 'सैराट'चे आहे.
या सिनेमात 'आक्का' अर्थातच अभिनेत्री छाया कदमची दोन घरे दाखवण्यात आली आहेत. शिवाय सार्वजनिक शौचालय, घरच्यांची आठवण आल्यामुळे आर्चीने जिथून फोन केला तो पीसी... हे सर्व काही पुण्यातील 'जनता वसाहत' येथे नागराज मंजुळे यांनी चित्रीत केले आहे. पुण्यातील पर्वती पायथ्यापासून ते हिंगण्यापर्यंत विस्तारलेल्या जनता वसाहतीमध्ये पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर गेल्यावर आर्ची-परशाच्या त्यांच्या खोलीच्या दिशेने टेकडीवर चढावे लागते. अरुंद गल्ली बोळांमधून चढून गेल्यानंतर अगदी वरच्या बाजुला वाघजाई मंदिर लागते. या मंदिराच्या उजव्या हाताला काही झोपड्या आहेत. झोपडपट्टीचे हे आकाशाला भिडलेले शेवटचे टोक आहे. तेथेच सिनेमात दिसणारी खोली आहे.

याच पुण्याच्या झोपडपट्टीत झालेल्या 'सैराट'च्या शूटिंगची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे तुम्हाला या पॅकेजमध्ये बघायला मिळणार आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कसे झाले होते येथे शूटिंग...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...