आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Sairat Team On Chala Hawa Yeu Dya Set

PIX: \'सैराट\'मय झाली \'चला हवा येऊ द्या\'ची थुकरटवाडी, परशा-आर्चीसह पोहोचले नागराज मंजुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित' सैराट' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. या सिनेमातील गाण्यांची झिंग लोकांवर चढली आहे. अजय-अतुल यांच्या संगीताचा मिडास टच असलेली सिनेमातील सर्वच गाणी तुफान गाजत आहेत. येत्या शुक्रवारी (२९ एप्रिल) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होतोय. रिलीजची डेट जवळ आल्याने सध्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याचनिमित्ताने सिनेमाची टीम पोहोचली 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर.
'चला हवा येऊ द्या'चा महाराष्ट्र दौरा पोहोचला सोलापूरमध्ये आणि सोबतीला आहे 'सैराट'ची टीम. नागराज मंजुळे, अजय-अतुल, रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, सुरज पवार, छाया कदम, निर्माते आणि झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांच्या हजेरीत चला हवा येऊ द्याचा यंदाचा एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणारेय.
२५ आणि २६ एप्रिल रोजी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम 'सैराटमय' झालेला दिसणारेय. आता 'सैराट'च्या टीमसोबत निलेश साबळेचे थुकरटवाडीतील कुटुंब काय धमाल करणार याचीच उत्सुकता लागली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, चला हवा येऊ द्या सेटवर पोहोचलेल्या 'सैराट'च्या टीमची धमाल आणि सोबतच जाणून घ्या, कसा रंगणारेय हा एपिसोड...