आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हैदराबादमध्ये 'सैराट'चा प्रीमिअर, आर्चीसोबत चाहत्यांचा 'झिंगाट' डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादः गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या ‘सैराट’ या सुपरहिट मराठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पेशल स्क्रिनिंगला सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख आणि अनुजा मुळे पोहोचले होते. तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने 'सैराट'च्या टिमला आमंत्रित केले होते. मात्र या स्क्रिनिंगला सिनेमातील लीड अॅक्टर आकाश ठोसर दिसला नाही.

स्क्रिनिंगनंतर मराठी प्रेक्षकांनी 'सैराट'च्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी 'सैराट'च्या सर्वच चाहत्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता. प्रेक्षकांची लाडकी आर्चीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबत थिरकली.

'सैराट' या सिनेमाचा लवकरच तेलगू भाषेत रिमेक बनवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतही सैराटचा फिव्हर कायम राहतो का, ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...