आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साँग रेकॉर्डिंगने झाला 'शाली'चा मुहूर्त, बेला शेंडेच्या आवाजात गीत झाले स्वरबद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साँग रेकॉर्डिंग करताना गायिका बेला शेंडे)

मुंबईः सिनेसृष्टीच्या उगमापासून ते आजपावेतो दमदार कथानक आणि पोषक वातावरणाची जोड हा मराठी सिनेमाचा आत्मा राहिला आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सा-यांनीच हे मान्य केल आहे. 'शाली' हा आगामी सिनेमा याच पठडीतील ठरणार आहे. तरुण दिग्दर्शक अतुल साटम यांच्या 'शाली' सिनेमात रसिकांना दमदार कथानाकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला तसेच फणसाप्रमाणे वरून काटेरी पण आतून रसाळ अशा मानवी व्यक्तिरेखांचे दर्शन घडणार आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या जुहू येथील आजीवासन स्टुडिओमध्ये कनक एन्टरटेन्मेंट या बॅनर खाली जयसिंग साटम निर्मित आणि अतुल साटम दिग्दर्शित 'शाली' सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सिनेमाच्या संहितेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर लगेच एका गीताचे ध्वनीमुद्रण करण्यात आले. मराठीतील आजचे आगाडीचे गीतकार गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या तसेच संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे ध्वनीमुद्रण यावेळी गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात करण्यात आले.
कै. शंकर पाटील यांच्या 'शारी' या कथेने प्रेरित होऊन अतुल साटम यांनी लिहलेल्या चित्रपटकथा-पटकथेवर जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 'शाली'चे संवाद लेखन करीत आहेत.
या सिनेमाचे कथानक एका तरुण मुलीभोवती गुंफण्यात आले आहे. पंचविशीतल्या एका सुशिल, शालीन, बुद्धिवान तसेच कर्तव्यनिष्ठ तरुणीचे भावविश्व या सिनेमात रसिकांना जवळून पाहता येईल. 1970-80च्या दशकातील कोकणातील निसर्गसौंदर्य आणि मानवी स्वभावांचे दर्शन या सिनेमात घडेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाच्या मुहूर्तावेळी क्लिक झालेली छायाचित्रे...