चला हवा येऊ द्या... या शोच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये शुगर, सॉल्ट आणि प्रेम या चित्रपटाची टीम धम्माल करताना दिसणार आहे. नुकताच हा एपिसोड शूट करण्यात आला. यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या टीमने या सेटवर मंचावर चांगलीच धम्माल केली.
शुगर, सॉल्ट आणि प्रेम ही क्रांती रेडकर, शिल्पा तुळसकर आणि सोनाली कुलकर्णी या तीन मैत्रिणींची कथा आहे. चित्रपटाची कथा उलगडताना आपल्याला अजिंक्य देव, यतिन कार्येकर आणि प्रसाद ओक या चित्रपटात भेटतात.
चला हवा येऊ द्या च्या मंचावर अजिंक्य देव आणि प्रसाद ओक यांच्यासाठी भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या टीमने एक भन्नाट अॅक्ट सादर केले. शोचं शुटिंग संपल्यावर एक्सायटेड क्रांती रेडरकरने सर्वांसोबत सेल्फी काढली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या या कलाकारांनी चला हवा... च्या सेटवर किती धम्माल केली आहे, त्याचे Photo divyamarathi.com कडे आहेत. चला तर मग पाहुयात...
पुढील स्लाइड्सवर पाहा, शुगर, सॉल्ट आणि प्रेमच्या टीमने सेटवर केलेली धम्माल...