आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मित्रांनी पाहिला अभिनयचा सिनेमा 'ती सध्या काय करतेय', बघा स्क्रिनिंगचे Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी सिनेरसिकांचा गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. 16 डिसेंबर 2004 रोजी या हरहुन्नरी अभिनेत्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. आता लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे.  'ती सध्या काय करतेय' या सिनेमातून अभिनय बेर्डे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. आज (6 जानेवारी) रोजी अभिनयाचा पहिला सिनेमा रिलीज होतोय. 
 
यानिमित्ताने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मित्र परिवारासाठी मुंबईत नुकतेच या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला लक्ष्मीकांत यांचे मित्र जयवंत वाडकर, विजय कदम, पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेकांनी हजेरी लावून अभिनयला या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयवंत वाडकर यांनी अप्रतिमा सिनेमा असे म्हणून या सिनेमाचे कौतुक केले आहे. 

जॉनी लिव्हर यांचीही हजेरी...
या स्क्रिनिंगला बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर यांनीही विशेष हजेरी लावून लक्ष्याच्या मुलाला आशीर्वाद दिले. 

मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची उपस्थिती...
ती सध्या काय करतेय या सिनेमात अभिनय बेर्डे आणि सारेगमप लिटील चॅम्प्स फेम आर्या आंबेकर रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. तर अंकुश चौधरी आण तेजश्री प्रधान हे कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाच्या स्क्रिनिंगला अभिनयची आई प्रिया बेर्डे आणि धाकटी बहीण स्वानंदी यांनी हजेरी लावली होती. तर भरत जाधव त्यांच्या पत्नीसोबत पोहोचले होते. याशिवाय श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती, आदिनाथ कोठारे यांनीही हजेरी लावली होती. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, ती 'सध्या काय करतेय' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे..    
बातम्या आणखी आहेत...