आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS : या फिल्मच्या निमित्ताने एकत्र आले हे मराठी सेलेब्स, बॉयफ्रेंडसोबत पोहोचली \'आनंदी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः सई ताम्हणकर, शरद केळकर, मयुरी वाघ, पियुष रानडे, जयवंत वाडकर, गणेश आचार्य, सायली संजीव, कॉमेडियन सुनील पाल, कोरिओग्राफर फुलवा खामकर, संगीतकार निलेश मोहरीर, अमृता सुभाष, रसिका सुनील, सचिन पिळगावकर, निथा शेट्टी हे सर्व कलाकार अलीकडेच एकत्र आले होते. निमित्त होते 'तुला कळणार नाही' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी स्टार हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला असून चित्रपटाला सिनेरसिकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून आपल्या भेटीला आला आहे.
 
बॉयफ्रेंडसोबत पोहोचली 'आनंदी'...
बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि आनंदी या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री अविका गौरसुद्धा या मराठी चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजर होती. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत तिचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता मनीष रायसिंघानीसुद्धा दिसला. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु आहे. मनीष अविकापेक्षा दुप्पट वयाचा आहे. 
 
पाहुयात, 'तुला कळणार नाही' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला क्लिक झालेली मराठी सेलेब्सची खास झलक...  
 
फोटोः अजित रेडेकर 
बातम्या आणखी आहेत...