आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातं Hang झालं की एकदा तरी Restart करून बघावं... बघा \'तुला कळणार नाही\'चा Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमँटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमातून त्यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा येत्या 8 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या जोडीला येत आहे. नातं Hang झालं की एकदा तरी Restart करून बघावं... ट्रेलरमधील हा संवाद लक्षात राहिल असा आहे.  
 
एकमेकांवरचे अबोल प्रेम दाखवणारा हा ट्रेलर घराघरातील प्रत्येक नवरा बायकोला आपलासा करणारा आहे. वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे, सोडता येत नाही आणि पकडतादेखील येत नाही अशी गत आपल्यापैकी अनेकांची झाली असते. त्यावेळी ते कोणता मार्ग निवडतात? जोडीदारांचे वाढते अहंकार आणि त्यासोबतच वाढत जाणा-या अव्यक्त प्रेमाची जाणीव, या द्वंदात अडकलेल्या जगातल्या प्रत्येक नवराबायकोची सुंदर कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या ट्रेलरमधील सुबोध- सोनालीची केमिस्ट्री अगदी चांगली जुळून आली असून, त्यांच्या चाहत्यांना राहुल अंजलीची ही लग्नानंतरची लव्हस्टोरी भरपूर आवडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेता स्वप्नील जोशी या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
पुढील स्लाईडवर बघा, 'तुला कळणार नाही' या चित्रपटाचा ट्रेलर...
बातम्या आणखी आहेत...