आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Screening Photos : 'उबुंटू'च्या स्क्रिनिंगला नव-यासोबत पोहोचली स्पृहा, हे मराठी सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः पुष्कर श्रोत्रीचा 'उबुंटू' हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून  पुष्कर श्रोत्री एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, कथा, संवाद अशा सर्व जबाबदाऱ्यांचा भार त्याने पेलला आहे. शाळा, शालेय जीवनात होणारा कल्ला, बालवयात असणारी चिकीत्सक वृत्ती आणि त्याला गावाची, गावकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीची जोड देणअयात आली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मित्रमंडळींसाठी पुष्करने या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत ठेवले होते.
 
स्क्रिनिंगला मराठी सेलेब्सची मांदियाळी... 
या स्क्रिनिंगला अभिनेत्री स्पृहा जोशी तिचे पती वरद लघाटेसोबत पोहोचली. याशिवाय आदेश बांदेकरसुद्धा पत्नी सुचित्रा आणि मुलगा सोहमसोबत यावेळी उपस्थित होते. अभिनेते सचिन पिळगांवकर, जयवंत वाडकर, सचित पाटील, सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी भावे, संगीतकार कौशल इनामदार यांच्यासह अनेक सेलेब्स स्क्रिनिंगला पोहोचले होते.
 
सुबोध भावेच्या मुलाचे मोठ्या पडद्यावर पदार्पण... 
या चित्रपटातून अभिनेता सुबोध भावेचा मुलगा कान्हा भावे मोठ्या पडद्यावर झळकला आहे. कान्हाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
 
अमिताभ बच्चन यांनी केले होते उबुंटूचे कौतुक...  
अमिताभ बच्चन यांनी 'उबुंटू'चे तोंडभरुन कौतुक केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन ‘उबुंटू’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. हा ट्रेलर शेअर करत बच्चन यांनी इतरांनाही तो पाहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये काही अर्थपूर्ण आणि सुरेख अशी कथानकं साकारण्यात येत आहेत, असे म्हणत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. 
 
बघा, 'उबुंटू'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...