आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मान्यवरांच्या उपस्थिती रंगला \'व्हॉट अबाऊट सावरकर?\' चा प्रीमिअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन एका वेगळ्या कथाविषयावर तयार झालेल्या 'व्हॉट अबाऊट सावरकर?’या मराठी सिनेमाचा भव्य प्रीमिअर नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहा आंबेकर, माजी पोलिस सहआयुक्त वाय. सी. पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सिनेमातील कलाकारांचे आणि निर्माते-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एन्टरटेनन्मेंट प्रस्तुत रोहित शेट्टी आणि अतुल परब निर्मित 'व्हॉट अबाऊट सावरकर?' 17 एप्रिलपासून चित्रपटगृहांत दाखल होतोय.
निलेश मालप, गगन बाया आणि नीती सिंग या सिनेमाचे सहनिर्मात 'व्हॉट अबाऊट सावरकर?’ सिनेमात शरद पोंक्षे, विवेक लागू, अविनाश नारकर, अतुल तोडणकर, सारा श्रवण, श्रीकांत भिडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
'व्हॉट अबाऊट सावरकर?'मध्ये एका ध्येयवेडया तरुणाचा झालेला सामान्य नागरिक ते जन-नायकापर्यंतचा प्रवास रेखाटतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्याचादेखील आढावा घेण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या प्रीमिअरला उपस्थित असलेल्या मान्यवरांची छायाचित्रे...