आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FILMFARE अवॉर्ड्समध्ये \'कट्यार...\'ची बाजी, जाणून घ्या कुणाकुणाला मिळाली \'ब्लॅक लेडी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 नोव्हेंबरच्या रात्री मुंबईतील रिलायन्स स्टुडिओमध्ये मोठ्या जल्लोषात दुसरा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. फिल्मफेअर पुरस्कारांसाठी देण्यात येणाऱ्या ‘ब्लॅकलेडीला’ कलाकार फार महत्त्व देतात. यंदाच्या मराठी फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये कुणी बाजी मारली याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. कुणाच्या हातात फिल्मफेअरची ब्लॅक लेडी जाणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी खास होतं. कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डस मराठी 2016 च्या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात बाजी मारली आहे 'कट्यार काळजात घुसली', 'ख्वाडा' या सिनेमांनी. एक नजर टाकुया कर्म फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या विजेत्यांवर... (कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डसच्या रेड कार्पेटवर अवतरलेले तारांगण बघण्यासाठी येथे क्लिक करा... )
कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डस मराठी 2016 च्या विजेत्यांची यादी

उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
संतोष फुटाणे – कट्यार काळजात घुसली
उत्कृष्ट सिनेमाटोग्राफी
अविनाश अरूण – किल्ला
उत्कृष्ट स्टोरी
नितीन अडसुळ – परतू
उत्कृष्ट स्क्रिनप्ले
अश्विनी शिडवानी, गजेंद्र अहिरे – द सायलन्स
उत्कृष्ट डायलॉग
चैतन्य ताम्हाणे – कोर्ट
उत्कृष्ट एडिटिंग
रिखाव देसाई – कोर्ट
उत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर
संतोष मुळेकर – कट्यार काळजात घुसली
उत्कृष्ट कोरिओग्राफी
उमेश जाधव – धनक धनक (उर्फी)
उत्कृष्ट साऊंड डिझाइन
महाविश सब्बानवार – ख्वाडा
उत्कृष्टसिनेमा
कट्यार काळजात घुसली
उत्कृष्ट दिग्दर्शक
सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
उत्कृष्ट अभिनेता
सचिन पिळगांवकर – कट्यार काळजात घुसली
उत्कृष्ट अभिनेत्री
मुक्ता बर्वे – डबल सिट
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
किशोर कदम – परतू
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
नीना कुलकर्णी – बायोस्कोप
उत्कृष्ट संगीत
पं. जितेंद्र अभिषेकी, शंकर एहसान लॉय – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट गीतकार
मंगेश कानगने – सूर निरागस हो (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
शंकर महादेवन – सूर निरागस हो – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
आनंदी जोशी – किती सांगायच मला (डबल सिट)
क्रिटीक्स अॅवॉर्ड्स
क्रिटिक सर्वोत्कृष्ट सिनेमा
कोर्ट , किल्ला
क्रिटिक सर्वोत्कृष्ट अभिनेता
अंकुश चौधरी (डबल सिट)
क्रिटिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
गितांजली कुलकर्णी (कोर्ट)
सर्वोत्कृष्ट डेब्यू डायरेक्टर
भाऊराव खऱ्हाडे (ख्वाडा)
ओम राऊत (लोकमान्य – एक युग पुरूष)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरूष)
गश्मिर महाजनी – कॅरी ऑन मराठा / देऊळ बंद
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)
अंजली पाटील – द सायलन्स
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, कर्म फिल्मफेअर अॅवॉर्डस मराठी 2016 ची क्षणचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...