आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शाहरूख खानच्या ‘चैन्नई एक्सप्रेस’च्या स्टेशनवर, रवी जाधवच्या नव्या चित्रपटाचा First Scene

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युटिव्ही पिक्चर्सच्या रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरूख खान आणि दिपीका पदूकोण स्टारर ‘चैन्नई एकसप्रेस’मध्ये शाहरूख खान आणि दिपीका पदूकोण पहिल्यांदा एकमेकांना ट्रेनमध्ये भेटतात. ह्या ट्रेनच्या प्रवासात त्यांची ओळख होते, आणि मग पुढचा सिनेमा घडतो. रोहित शेट्टीने काही भाग मुंबई सेंट्रंल स्टेशनवर तर काही ट्रेनच्या आतले शाहरूख आणि दिपीकामधले संवाद एका स्टुडियोतल्या ट्रेनमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनचे सिक्वेन्स चित्रीत केले होते.
आता त्याच चित्रीकरण स्टुडियोमध्ये इरॉस इंटरनॅशनलच्या रवी जाधव निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘& बरचं काही’ ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सोमवारपासून सुरूवात झालीय. चित्रपटात मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, सिध्दार्थ मेनन, शिवानी रंगोले, सोनाली खरे, आणि इंद्रनील सेनगुप्ता आहेत.
चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी सोनाली, स्पृहा, सिध्दार्थ आणि शिवानी हेच कलाकार होते. सिध्दार्थ मेनन चित्रपटाबद्दल सांगतो, “ कमी बोलणा-या, आपल्यातच राहणा-या, एक कलावंत मनाच्या निशांतच्या भूमिकेत मी आहे. आत्ताच्या सिक्वेन्समध्ये मी आणि माझी बहिण ट्रेनमधून चाललोय. दादरवरून आम्ही पूण्याला चाललोय. आणि शाहरूख खानच्या चित्रपटाचे शुटिंग इथेच झाल्याने आता तेच लक आमच्याही फिल्मला मिळो, एवढीच आमची अपेक्षा आहे.”
सोनाली खरे ब-याच अवधीपासून सिनेमाक्षेत्रापासून लांब होती. ‘चेकमेट’नंतर जवळ जवळ आठ वर्षांनी ती सिल्व्हर स्क्रिनवर परततेय. ती म्हणते,“चित्रपटात परतताना, शाहरूख खानने जिथे शुट केलंयत, तिथून चित्रीकरणाला आमची सुरूवात होतेय, म्हटल्यावर शाहरूखच्या फिल्म सारखी आमची फिल्म हिट होईल, अशी आशा करूया. मी फिल्ममध्ये एका छोट्या भूमिकेमध्ये तुम्हांला दिसेन. मृणालताईच्या लहान बहिणीची नलूची मी भूमिका करतेय. मी आणि माझी भाची एकत्र मुंबईत राहतो. आणि आता आम्ही दादरवरून पुण्याला चाललोय, असा सिक्वेन्स चित्रीत करतोय. दोन पिढ्यांमधलं अंतर, आणि कुटूंबांमधला दूरावा ह्याबद्दलची ही फिल्म आहे.”
(फोटो - अजित रेडेकर )
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का करतोय रवी जाधव ‘चैन्नई एकस्प्रेस’च्या चित्रीकरणस्थळी शुटिंग