आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Porn Sitesवर 24 तासांत निर्णय, FTII विद्यार्थ्यांना का डावलता? मराठी स्टार्सचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारने प़ॉर्न साइट्सवर बंदी घातली, त्यानंतर लगेचच उहापोह झाला. आणि त्यानंतर २४ तासांत ती बंदी हटवली गेली. मात्र गेले ५७ दिवस पुण्यातल्या 'फिल्म एन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्य़ांच्या आंदोलनावर सरकारने आडमूठे धोरण स्विकारले आहे, त्यामुळे आता हे सरकार नक्की देशाच्या भवितव्यावर कितपत गांभीर्याने विचार करतंय, असा थेट सवाल, मराठीतल्या आघाडीच्या पाच फिल्ममेकर्सनी विचारलाय.
हे फिल्ममेकर्स आहेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'किल्ला'चे दिग्दर्शक अविनाश अरूण, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'देऊळ'चे दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिल्ममेकर आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी, बॉक्स ऑफिसवर 'बालक पालक', 'टाइमपास'सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणारे फिल्ममेकर रवि जाधव आणि 'रेगे' सारखा अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले अभिजीत पानसे.
ह्या पाचजणांनी एकत्र येऊन आता जर सरकारने लवकरात लवकर FTIIच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला नाही, तर सरकारविरूध्द दंड थोपटण्याचा इशारा दिलाय.
रवि जाधव म्हणतात," पॉर्न साइट्सवर तडकाफडकी निर्णय झाला. आणि त्यानंतर टीव्ही चॅनलपासून सोशल नेटवर्किंग साइट्सपर्यंत वेगवेगळ्या माध्यामांतून निषेध व्यक्त झाल्यावर लगेच २४ तासात निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. मग गेले ५७ दिवस सातत्याने देशाचे भवितव्य असलेले FTIIचे विद्यार्थी, गजेंद्र चौहान ह्यांच्याविरूध्द आंदोलन करतायत.आणि आता ह्यावर आम्ही काही करू शकत नाही, असे बोलून सरकार हात वर करतंय, हा दूट्टप्पीपणा नाही का?.. मोदी सरकार मेक इन इंडियाबद्दल बोलतं. मग हे जे भावी फिल्ममेकर शिकून आपल्या देशात फिल्म बनवून देशविदेशात भारताची मान उंचावणार आहेत. त्याच्याविषयी सरकारला कळवळा का येऊ नये? हा प्रश्न पडतो. "
पुढील स्लाइडमध्य़े वाचा, गजेंद्र चौहान ह्यांच्या बी-ग्रेड सिनेमांविषयी...
बातम्या आणखी आहेत...