आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Films Have To Fight With Salman Khan Film On Box Office This Diwali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Fight : दिवाळीत बॉक्स ऑफिसवर सलमान vs सन्नी vs स्वप्निल vs सुबोध-सचिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर चार मचअवेटेड फिल्म्स रिलीज होणार आहेत. राजश्री प्रॉडक्शन निर्मित सूरज बडजात्या दिग्दर्शित सलमान खान स्टारर ‘प्रेम रतन धन पायो’, आणि सन्नी देओल स्टारर ‘घायल-रिटर्न्स’ ह्या बॉलीवूडपटांसोबतच दोन मराठी फिल्म्स रिलीज होत आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे स्टारर ‘मुंबई-पूणे-मुंबई-२’ आणि एस्सेल व्हिजन निर्मित सुबोध भावे दिग्दर्शित मल्टिस्टारर ‘कट्यार काळजात घुसली’.
सलमान खानची ‘प्रेम रतन धन पायो’ आणि स्वप्निल जोशी स्टारर ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत. तर सन्नी देओल दिग्दर्शित ‘घायल रिटर्न्स’ आणि सुबोध भावे स्टारर ‘कट्यार काळजात घुसली’ १३ नोव्हेंबरला झळकणार आहेत.
थोडक्यात बॉक्स ऑफिसवर सलमान खान विरूध्द स्वप्निल जोशी विरूध्द सचिन पिळगांवकर आणि सुबोध भावे अशी टक्कर आहे. ब-याचदा जेव्हा बॉलीवूडच्या मोठ्या फिल्म रिलीज होतात, तेव्हा त्याचा फटका मराठी फिल्मला बसतो. मल्टिप्लेक्स सहित सिंगल स्क्रिनमधले जास्तीत जास्त खेळ हे हिंदी सिनेमाला मिळतात. आणि मग मराठीला दिवसाला एक किंवा दोन शोजवरच समाधान मानावे लागते. कधी कधी तर मराठी सिनेमांना अक्षरश: गाशा गुंडाळण्याची परिस्थिती येते.
स्वप्निल जोशी स्टारर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ गेल्यावर्षीच्या दिवाळीत शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’सोबत रिलीज झाली. परिणाम अर्थातच ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ला भोगावा लागला. मूंबईतून आठवड्याभरात तर बाकी महाराष्ट्रातून दोन आठवड्यांनी ‘प्यारवाली..’चे शोज कधी गूल झाले ते प्रेक्षकांना कळलेच नाही. पून्हा एकदा तीच भीती सिनेमा-वर्तृळात व्यक्त केली जात असली, तरीही ह्या दोन्ही मराठी सिनेमांचे निर्माते कॉन्फिन्डट वाटतायत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, एस्सेल व्हिजनने केलीय तयारी सलमान खानला टक्कर देण्याची