आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Glamours Actress Attended Colors Marathi Anniversary Bash

PIX: कलर्स मराठीच्या Anniversary Bash ला आल्या ग्लॅमरस मराठी तारका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही पार्टीत ग्लॅमरस चेहरे असले की, पार्टी जास्तच आठवणीत राहते. कलर्स मराठीला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालंय. आणि त्यानिमीत्ताने झालेल्या त्यांच्या एनिव्हर्सी पार्टीला ग्लॅमरस मराठी तारकांची तर मांदियाळीच पाहायला मिळाली.
सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, मुक्ता बर्वे, नेहा पेंडसे, श्रुती मराठे, क्रांती रेडकर,स्मिता तांबे, भार्गवी चिरमुले, गिरीजा ओक ह्या मराठी सिनेमातल्या ग्लॅमरस तारकांसोबतच इशा कोप्पीकर आणि तनिशा ह्या हिंदी सिनेमात आपला ठसा उमटवलेल्या मराठी असलेल्या ग्लॅमरस अभिनेत्रीही ह्या पार्टीला आल्या होत्या.
ह्यासोबतच मृणाल कुलकर्णी, किशोरी शहाणे, प्रतिक्षा लोणकर, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी, निर्मिती सावंत, ह्या सिनीयर मराठी तारकांमूळे ह्या वर्षपूर्तीच्या पार्टीची रंगत वाढली होती.
सचिन पिळगांवकर, महेश मांजरेकर, सुबोध भावे, सचिन खेडेकर, श्रेयस तळपदे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, अनिकेत विश्वासराव, स्वप्निल जोशी, सुशांत शेलार ह्या अभिनेत्यांचीही पार्टीत उपस्थिती होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कलर्स मराठीच्या पार्टीत आलेल्या ग्लॅमरस तारकांचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)