आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाड्यातील रहस्य आता येणार समोर, 'चाहूल २' मालिकेत सर्जाचा चेहराच उलगडणार सत्य !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'चाहूल २' मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही. या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे ती म्हणजे सर्जासारखाच दिसणारा दुसऱ्या व्यक्तीचादेखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले आहे.
 
या दुसऱ्नाया व्वयक्तीचे नाव साहेबराव आहे. साहेबराव हा सुरेखाचा नवरा असून तो वाड्यामधून गायब आहे. सर्जाचा रोल करत असलेल्या अक्षर कोठारी या साहेबरावच्या लुक मध्ये अगदीच वेगळा दिसत आहे ज्यामध्ये अक्षरला पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा देण्यात आला आहे. त्यामुळे आता तुमचा लाडका सर्जा एका नव्या लुक आणि रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  हा साहेबराव वाड्यातून गायब का झाला? सुरेखा त्याच्या फोनवर काय बोलत असते? आता सर्जाचा चेहराच उलघडणार का हे वाड्यातील रहस्य? अश्या अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
 
सर्जाला वाड्यातील एका पेटीमध्ये साहेबरावचा फोटो मिळतो आणि त्याला प्रश्न पडतो कि हा माणूस हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो पण हा कोण आहे हे त्याला माहिती नसते. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र सारखेच आहेत. सर्जाला भायजोच्या बोलण्यातून सुगावा लागतो कि, हा साहेबराव सुरेखाचा नवरा आहे. साहेबराव वाड्यामध्ये का राहत नाही? सुरेखा काय लपवत आहे हे शोधण्याचा निर्धार करतो. वाड्यामध्ये राणी म्हणजेच खऱ्या शांभवीला देखील साहेबरावबद्दल कळते आणि त्याच्या बद्दलची माहिती मिळत असताना असे देखील कळते कि, त्याने सुरेखा हि आपली पहिली पत्नी असताना दुसऱ्या बाईला घरात आणले होते. या बाईला का घरात आणले? याचे उत्तर अजून मिळाले नाही.
 
बातम्या आणखी आहेत...