आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर शहारे आणेल \'लपाछपी\'चा हा टीझर, पूजा सावंतने सांगितले \'हेडफोड लावून पाहा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री पूजा सावंतची मुख्य भूमिका असलेला हॉररपट 'लपाछपी'चा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्येही दिग्दर्शकाने 'लपाछपी' दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण चित्रपटात पूजा सावंतशिवाय अजून कोणते कलाकार असणार ते अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
 
अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या सोशल नेटवर्कींग साईटवर चित्रपटाचा दुसरा टीझर शेअर केला आहे. याअगोदरही चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता पण त्यातही कोणत्याच कलाकाराला दाखविण्यात आले नाही. 
 
काय आहे 'लपाछपी' चित्रपटात..
सत्य घटनेवर बनविण्यात आलेला मराठीतील पहिला दर्जेदार हॉररपट अशी गणना या चित्रपटाची करण्यात येत आहे. मुंबईतील डिसुझा चाळ ही जागा एका महिलेच्या भुताने झपाटलेली जागा मानली जाते. एका महिेलेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याने या जागी अजूनही तिची आत्मा फिरते असे येथे राहणाऱ्या लोकांनी सांगितले आहे.
 
(शेवटच्या स्लाईडवर चित्रपटाचे २ टीझर)
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, रिलीजअगोदरच पटकावले अनेक पुरस्कार..
बातम्या आणखी आहेत...