आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जन मिरवणुकीत असा असतो मराठी \'कलावंतां\'चा अंदाज, ढोल-ताशांचा करतात गजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 5 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी असून गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकींचा वेगळाच थाट असतो. विशेषतः पुण्यात ठिकठिकाणी मोठमोठ्या मिरवणुकी काढल्या जातात. ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात मानाच्या गणपतींना निरोप दिला जातो. सामान्यांप्रमाणेच मराठी कलावंतसुद्धा बाप्पासाठी ढोल-ताशांचा गरज करताना दिसतात. 

विशेष म्हणजे 2014 साली काही मराठी कलाकारांनी एकत्र येऊन 'कलावंत ढोल ताशा पथक' सुरु केले आहे. अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत. हे सर्व कलाकार मिरवणुकींमध्ये बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर करतात. 

बाप्पावरचं प्रेम आणि ढोलाचा आवाज यात बाकी सगळं विसरायला होतं. या वादनाची एक वेगळीच झिंग चढते, असे अभिनेता आस्ताद काळे म्हणतो. यावर्षीसुद्धा हे कलावंत पथक मिरवणुकांमध्ये दुमदुमणार हे नक्की..!

पाहुयात, गेल्या दोन-तीन वर्षांतील गणपती आगमन-विसर्जन मिरवणुकीतील 'कलावंतां'ची खास छायाचित्रे... 
 
फोटो साभारः Kalaawant Foundation आणि Capture Moments फेसबुक पेज 
बातम्या आणखी आहेत...