बहू प्रतिक्षित असलेल्या 'बाजी' या मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. श्रेयस तळपदे अभिनीत हा सिनेमा अॅक्शन, रोमान्स आणि अॅडव्हेंचरने भरलेला आहे. या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये श्रेयस तळपदे, अदिनाथ कोठारे, दीप्ती तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, सिनेमा दिग्दर्शक निखिल महाजनसारखे स्टार्स उपस्थित होते.
2008मध्ये 'सनई चौघडे' या मराठी सिनेमात झळकलेला श्रेयस 'बाजी'मध्ये मुख्य भूमिका साकारून तब्बल सात वर्षांनी मराठी सिनेसृष्टीत झळकणार आहे. अलीकडेच त्याचा 'पोश्टर बॉइज'सुध्दा रिलीज झाला, मात्र त्यात त्याची मर्यादीत भूमिका होती.
मधल्या काळात हिंदी सिनेसृष्टीत रमलेल्या श्रेयससोबत या सिनेमात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी हे कलाकार दिसणार आहेत. जितेंद्र यामध्ये नकारात्मक भूमिका वठवत असून अमृता श्रेयसच्या प्रेयसीच्या पात्रात दिसणार आहे.
'बाजी'चे दिग्दर्शन 'पुणे 52' फेम निखिल महाजनने केले आहे. हा सिनेमा पुढील वर्षी अर्थातच 6 फेब्रुवारी 2015 रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बाजीचा ट्रेलर आणि ट्रेलर लाँचिंगला पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...