आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देवा' च्या घरात 'अफलातून' स्वागत, ट्रेलर लाँचबरोबर पाहुण्यांना सुखद धक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या १ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या सिनेमाच्या चर्चेला आता वेग आला आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीचे अनोखे फंडे लोकांना आवडत आहेत. नुकत्याच या सिनेमाच्या ट्रेलरचे आणि प्रमोशनल साँगचे एका हटके अंदाजात रंगीत सोहळा पार पडला. 'देवा' या सिनेमातील प्रमुख पात्राचे अतरंगी घर त्यासाठी उभारण्यात आले होते. विविध आश्चर्यांनी या घरात उपस्थितांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

दिग्दर्शक मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' या अतरंगी पात्राचे पोस्टर जितका कलरफुल आहे, तितकाच कलरफुल या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळाला.  अंकुशचा ‘देवा’ लूक  आणि तेजस्विनीच्या ‘माया’ या भूमिकेबरोबरच आणखी एक गोड धक्का मिळाला, तो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील या सिनेमामध्ये आहे. शिवाय दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचीदेखील झलक यात दिसत असल्यामुळे, त्यांच्या आठवणीलादेखील या कार्यक्रमात उजाळा मिळाला.

 

यानंतर अजून एक सुखद धक्का म्हणजे, ‘देवा’चे प्रमोशनल साँग! अजय गोगावले यांचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने वेगळ्या पठडीतले गाणे अजयने गायले आहे. 

 

क्षितिज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले असून, 'देवा' च्या व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे सिनेरसिकांना नक्कीच आवडेल. आयुष्याची विस्कटलेली घडी उलगडणारा हा 'देवा', प्रेक्षकांना पडलेले एक कोडे असून, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे कोडे सुटणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही 'देवा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अश्या या ‘देवा’ च्या अतरंगी घरात ट्रेलर आणि म्युझिक लाँचबरोबर अनेक सुखद धक्क्यांनी पाहुण्यांची संध्याकाळ रंगतदार झाली.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, देवाच्या ट्रेलर लाँचचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...