आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Elizabeth Ekadashi Premier For Stars

\'एलिझाबेथ एकादशी\'चा झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसाठी खास प्रीमिअर, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परेश मोकाशी दिग्दर्शिक 'एलिझाबेथ एकादशी' हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेमानंतर परेश मोकाशी यांच्या 'एलिझाबेथ एकादशी'विषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. हीच उत्सुकता मराठी कलाकारांमध्येसुद्धा दिसून येत आहे.
ही उत्सुकता जास्त ताणून न धरता झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसाठी अलीकडेच या सिनेमाचा खास प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला 'का रे दुरावा', 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेमातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले तीन कलाकार म्हणजेच श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर आणि पुष्कर लोणारकर यांच्यासह त्यांनी फोटोसुद्धा काढून घेतले.
या प्रीमिअरला दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका आणि परेश मोकाशी यांच्या पत्नी मधुगंधा कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एलिझाबेथ एकादशी'च्या प्रीमिअरला हजेरी लावणा-या कलाकारांची खास छायाचित्रे...