आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबटगोड नात्यांचा \'मुरांबा\'चे ट्रेलर रिलीज, ऑफ शोल्डर लूकमध्ये दिसली मिथीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेय वाघने यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला फेसबुकवरून जाहीर करून टाकलं, - ‘माझी व्हॅलेंटाईन मिथिला पालकर!’ पण नंतर काही दिवसातच स्पष्ट झाले की हे दोघे प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन नाहीत तर वरूण नार्वेकर दिग्दर्शित आगामी ‘मुरांबा’ या चित्रपटातले आलोक आणि इंदू आहेत!
 
 त्या क्षणापासून सोशल मिडीयावर आणि एकूणच मराठी सिनेवर्तुळ तसेच चाहत्यांमध्ये आलोक आणि इंदू यांचा धुडगूस चालू आहे. बरं, या दोघांचा हा धुडगूस चालू असतानाच आलोक च्या आई बाबांनी, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत यांनी फेसबुकवर ‘लाइव्ह’ जाणारा व्हिडीओ टाकून धमाल उडवून दिली. या व्हिडीओमुळे आलोक, इंदू आणि आलोकचे आई बाबा यांचं जग अत्यंत खुमासदार पद्धतीने लोकांसमोर आलं आणि त्याचं जोरदार स्वागत झालं.
 
 या पाठोपाठ आलं जसराज, सौरभ आणि ह्रिषीकेश यांनी संगीतबद्ध केलेले मिथिला पालकर आणि जसराज जोशी यांनी गायलेलं ‘मुरांबा’ हे गाणं आणि त्यानंतर अमेयच्याच आवाजातलं ‘चुकतंय’ हे गाणं..!! यातून अमेयच्या आयुष्यात काहीतरी चुकतंय याची झलक पहायला मिळाली आणि मागोमाग आलेला मुरांबाचा ‘ट्रेलर’. त्यात तर आलोक आणि इंदूच्या ब्रेकअपचा बॉम्ब पडलाय. ब्रेकअप झालेले आलोक, इंदू आणि या दोघांच्या ब्रेकअप मध्ये घुसलेले आलोकचे आई बाबा असं त्रांगडं असलेला हा ‘मुरांबा’ नेमका आहे तरी काय, अशी उत्सुकता निर्माण झालीये ती त्यामुळेच.
 
सोळाव्या वर्षी वडील आणि मुलगा एकमेकांचे मित्र होतात म्हणे पण दोन्ही बाजूंकडून मैत्रीच्या मर्यादा आणि नियम पाळले जात नाहीत. अनुभव आणि सातत्याने बदलणारं बाहेरचं जग यातली जुगलबंदी टाळता आली तर बाप-मुलगा, आई-मुलगा, सासू-सून या नात्यांचा मुरांबा, त्यातील गोडी आयुष्यभर टिकू शकेल, हे सांगणारा हा खुमासदार सिनेमा आहे.
     
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिथीलाचा ऑफ शोल्डर लुक आणि 'मुरांबा' च्या ट्रेलरची चित्रझलक...
बातम्या आणखी आहेत...