आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कुणी घर देता का घर...\', हे आहेत \'नटसम्राट\'मधील दमदार डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. आजही अनेकांना या नाटकाचे संवाद पाठ आहेत. मराठी रंगभूमीवर आपल्या कथानकाने अजरामर ठरलेले 'नटसम्राट' आज सिनेमाच्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकले आहे.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्यानंतर राम जाधव, सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे यांनी हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते. यांनी साकारलेली ही भूमिका अजरामर झाली. नटकाप्रमाणेच या सिनेमातही अविस्मरणीय संवाद आहेत.
आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे 'कुणी घर देता का घर...' असेच अनेक डायलॉग या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना ऐकायला मिळत आहेत.
आज आम्ही तुम्हाला 'नटसम्राट' सिमेमातील काही लोकप्रिय संवाद सांगत आहोत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'नटसम्राट' या बहुचर्चित सिनेमातील काही डायलॉग्स...
बातम्या आणखी आहेत...