आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Natsamrats Record Break Box Office Collection Earn 35.10 Crore

\'नटसम्राट\'ने रचला इतिहास, 35.10 कोटींचा गल्ला जमवत मोडला \'लय भारी\'चा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनीत 'नटसम्राट' या सिनेमाने मराठीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम आपल्या नावी केलाय. 'नटसम्राट'ने 35.10 कोटींची कमाई चौथ्या आठवड्यातच केली. लय भारी, दुनियादारी, टाईमपासला या सिनेमांना 'नटसम्राट'ने मागे टाकले आहे. ( 'कुणी घर देता का घर...', हे आहेत 'नटसम्राट'मधील दमदार डायलॉग्स)
यापूर्वी मराठीत सर्वाधिक कमाईचा विक्रम अभिनेता आणि निर्माता असलेल्या रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या सिनेमाच्या नावावर होता. ‘लय भारी’ने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींची कमाई केली होती. मात्र अवघ्या चार आठवड्यांत ‘नटसम्राट’ने ‘लय भारी’ला मागे टाकले आहे. (Xclusive:सलमान खान पोहोचला नटसम्राटच्या Success पार्टीत, लवकरच पाहणार फिल्म)
नववर्षांच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या सिनेमात साडेसहा मिनिटांचा नवा सीन अॅड करून तो पुन्हा नव्याने प्रदर्शित करण्यात आला. (‘नटसम्राट’ सुपरहिट, आठवडाभरात 22 कोटींची विक्रमी कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा)
'नटसम्राट'मधील दमदार डायलॉग्स 'कुणी घर देता का घर...' यांनी रसिकांवर मोहीनी घातलेय. मराठी सिनेमात एवढा गल्ला कोणताही सिनेमा जमवू शकलेला नाही. यापूर्वी दुनियादारीने 26 कोटी, टाईमपास 2 ने 28 कोटी तर टाईमपासने 32 कोटींची कमाई केली. अभिनेता रितेश देशमुखच्या लय भारीने 35 कोटींची कमाई केली होती. हा विक्रम 'नटसम्राट'ने मोडीत काढत आपल्या नावावर केलाय. ('नटसम्राट'मध्ये जुगलबंदीची मेजवानी, नाना, विक्रम गोखलेंची नवी दृश्ये समाविष्ट)
कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेली ‘नटसम्राट’ ही रंगभूमीवरील अजरामर कलाकृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पेलले. नाना पाटेकर यांनी यात आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. नानांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तर पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. दरम्यान, ‘नटसम्राटची 30 टक्के रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची घोषणा नाना पाटेकर यांनी सिनेमाच्या रिलीजपूर्वी केली होती.
पुढे वाचा, धक-धक गर्लने केले 'नटसम्राट'चे कौतुक...