आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'न्यूड' चित्रपट नवीन वादाच्या भोवऱ्यात, हिंदी लेखिकेने केला कथा चोरल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेले कित्येक दिवस न्यूड चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट इफ्फीमधून बाहेर काढून टाकल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांच्यापुढे आता पुन्हा मोठी अडचण निर्माण झाली आहे. हिंदी लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ यांनी चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप दिग्दर्शक रवी जाधव यांच्यावर केला आहे आहे. 

 

रवी जाधव यांनी त्यांच्या 'न्यूड' या चित्रपटातून न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अशाच प्रकारची कथा मनिषा यांनी त्यांच्या कालिंदी या लघुकथेच आहे असे सांगितले आहे. आता या चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मनिषाने दिला आहे. 

 

लेखिका मनिषा यांनी सांगितले की, मी रवी जाधव यांच्याशी अगोदरच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण टीझर पाहिल्यानंतर ही माझीच लघुकथा असल्याचे मला कळाले आहे. लेखकांना पैसे किंवा सौजन्य देण्याची वृत्ती नसल्याने आता या विरोधात कोर्टात जाईल' असा इशाराहील त्यांनी दिला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, न्यूड चित्रपटाचा टीझर...

बातम्या आणखी आहेत...