आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निखळ प्रेमकथा मांडणा-या \'टाइमपास 2\'चा ट्रेलर रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'टाइमपास' सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अर्थातच 'टाइमपास 2' पुन्हा एकदा एक निखळ प्रेमकहाणी मांडणार आहे. या सिनेमाचा अलीकडेच ट्रेलर रिलीज झाला आहेत.
या सिनेमात कोण असणार याचीही उत्सूकता दिग्दर्शक रवी जाधव यांनी संपवली आहे. सिनेमात दगडूच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ताच्या भूमिकेत प्रिया बापट झळकणार आहे.
सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये प्रिया आणि प्रियदर्शन यांच्या पात्रांना एकमेकांना भेटण्याची उत्सूकता असल्याचे दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये दगडू आणि प्राजक्ता तरुण दिसत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला 'टाइमपास'मधील काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. 'टाइमपास 2' कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित हा सिनेमा 1 मे 2015 रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'टाइमपास 2'चा ट्रेलर...