आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्चीच्‍या आईने केले होते \'फँड्री\'तही काम; वाचा UNKNOWN FACTS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता चव्‍हाण - Divya Marathi
गीता चव्‍हाण
उस्मानाबाद - कुठलाही अभिनिवेश बाळगता, वरवरचा अभिनय करता कुटुंबात, समाजात ज्या पद्धतीने आपण वावरतो अगदी तसा अभिनय आणि संवादातील साधेपणा यामुळे सैराट चित्रपट मराठी माणसांना आपला वाटला. नागराज मंजुळे यांचा चित्रपट असल्यामुळे तो निश्चितच पुढे जाईल, असे वाटत होते. मात्र, तो रेकॉर्डब्रेक होईल, असे वाटले नव्हते, असे मत सैराट चित्रपटात आर्चीच्या आईची भूमिका करणाऱ्या गीता उर्फ भक्ती चव्हाण यांनी व्यक्त केले.
मूळच्या उस्मानाबादच्या आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या गीता चव्हाण मंगळवारी उस्मानाबादेत आल्या होत्या. यावेळी 'दिव्य मराठी'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सैराट चित्रपटाने आम्हा सर्व कलाकारांना एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. नागराज मंजुळे यांच्यामुळे मला हा मान मिळाला. मात्र, सैराट इतके उत्तुंग यश मिळवेल, याची खात्री नव्हती. फँड्री चित्रपटाने ७५ पुरस्कार पटकावले होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक सैराटची निर्मिती करीत आहेत, त्यामुळे चित्रपट नक्कीच पुढे जाईल, याची खात्री होती. नागराज सरांबरोबर कामाची संधी मिळाल्याने आनंद झाला होता. चित्रपटातील कथानक, बोलीभाषा अगदी साधारण असल्यामुळे लोकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले. चित्रपटातील ही भाषा प्रत्येकाला आपली वाटते. त्यात अजय-अतुलने अप्रतिम संगीत दिले आहे. लोकांना ही भाषा, हे संगीत, त्यातील साधेपणा भावला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गीता चव्‍हाण यांनी केले नऊ चित्रपटांत काम, फँड्रीच्‍या अपघाताच्‍या वेळी झाला होता अपघात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)