आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक केतकरच्या नाटकाचा येतोय सिक्वल, लवकरच रंगभूमीवर येणार ‘गोष्ट तशी गमतीची-२’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ अशी त्रिनाट्यधारा लिहीली गेली. त्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’ आणि ‘ऑल दि बेस्ट-२’ आलं. आता ‘गोष्ट तशी गमतीची’ ह्या नाटकाचा सिक्वल येणार आहे. नव्या नाटकात जन्या नाटकाचीच संपूर्ण टीम आहे.
‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकाचे निर्माते नंदू कदमच सिक्वलचीही निर्मिती करतील. त्याचप्रमाणे ‘गोष्ट तशी गमतीची’चेच लेखक-दिग्दर्शक जोडी मिहीर राजदा आणि अव्दैत दादरकर ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक असतील. शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम सिक्वलमध्येही मुख्य भुमिकेत असतील.
नाटकाविषयी अभिनेता शशांक केतकर म्हणतो, “माझ्यावर असा आरोप होतो, की, मालिका सुरू असताना लीड हिरोने नाटक करणं, शक्य नसतानाही शशांकने ते सुरू केलं. आणि त्याच्यामूळे मालिंकांमधले सर्व लीड हिरो मालिका करतानाही नाटकात काम करू लागले. पण मराठी नाट्यसृष्टीचे सध्या चांगले दिवस सुरू आहेत. आणि त्याचच प्रत्यंतर आहे, आता आमच्या नाटकाचा सिक्वल येतोय.”
शशांक सिक्वलविषयी सांगतो,“कुणाल दिक्षीत तोच असणार आहे. त्याचे आई-वडिलही तेच आहेत. फक्त आता सिक्वलमध्ये तिघांचंही थोडं वय वाढलेलं असणार आहे. आता घरात आणि विचारात काही बदल झालेत. काही जबाबदा-या बदलल्यात. नवीन विषय, नवे प्रॉब्लेम, नवा दृषिटकोणासह हे नाटक येतंय.”
तो म्हणतो, “आजपर्यंत मातब्बर लेखकांच्या नाटकाचे भाग-२ किंवा सिक्वल आपण मराठी रंगभूमीवर पाहिलेत. कारण त्यांचं साहित्य खूप लिहीलेलं आहे. पण एका नव्या नाटकाचा दूसरा भाग येतोय ही खरी तर खूप मोठी गोष्ट आहे.”
अभिनत्री लीना भागवत सांगते, “गोष्ट तशी गमतीची हे नाटक प्रेक्षकांना आपल्या घरातलं वाटतं. त्यातल्या आई,वडिल, आणि मुलाशी रसिकांचा भावनिक बंध जोडला जातो. अशावेळी हे नाटक फक्त जनरेशन गॅपचं आहे, असं म्हणून सोडून न देता ते थोडं अजून पूढे नेणं गरजेचं असल्याचं आम्हांला सगळ्यांनाच वाटलं आणि आता सिक्वल आम्ही घेऊन यायचं ठरवलं.”
मंगेश कदम म्हणतात, “फक्त गोष्ट तशी गमतीची नाटकाची लोकप्रियता सिक्वलमधून एनकॅश करू असा आमचा उद्देश नाही. तर लेखक मिहीर राजदाला आमच्या कुटूंबाच्या माध्यमातून एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावासा वाटला, आणि तो विषयही खूप चांगला असल्याने प्रेक्षकांना सिक्वलही आवडेल, ह्याची खात्री वाटल्याने आम्ही सिक्वल घेऊन येतोय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'गोष्ट तशी गमतीची'चे फोटो
(फोटो- स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...