रंगभूमीवर गेल्या वर्षी आलेल्या धमाल विनोदी ‘जस्ट हलकं फुलकं’ ह्या नाटकाने नुकतेच २०० प्रयोग पूर्ण केले आहेत. सध्या लोकप्रिय असेलेली कॉमेडी सुपरस्टार जोडी सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे ह्यांच्यासोबतच अभिनेत्री अनिता दाते ह्या तिघांच्या कॉमिक टायमिंगने रसिकांना तीन तास पोटभर खळखळून हसवणा-या ह्या नाटकाच्या डबल सेंच्युरी निमीत्ताने अनेक सिने-टीव्ही कलावंतांनी नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावली.
उमेश कामत, प्रसाद ओक, श्रेया बुगडे, कविता लाड, सतिश राजवाडे, विद्याधर जोशी, राजन भिसे, अनिकेत विश्वासराव, मंगेश बोरगांवकर ह्या सेलेब्सच्या उपस्थितीत २०० प्रयोगपूर्ती निमीत्ताने केक कापून छान सेलिब्रेशन करण्यात आले.
ऋषिकेश परांजपेंनी लिहीलेली ‘हलकं फुलकं’ ही नाट्यकृती सूमारे पंधरा वर्षापूर्वी जेव्हा रंगभूमीवर आली होती. तेव्हा रसिका जोशी,विजय कदम आणि नंदू गाडगीळ ह्यांनी त्यात अभिनय केला होता. विजय पाटकर ह्यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. आता तेच नाटक थोड्याफार बदलाने दिग्दर्शक गणेश पंडित ह्यांनी सादर केलं आहे.
गणेश पंडित नाटकाबद्दल सांगतात, “पून्हा रंगभूमीवर आणताना, कॉमेडी गांभिर्याने घेणारे कलाकार हवे होते. त्यामूळे सागर, कुशल आणि अनिताचे नाव पूढे आले. हे नाटक जेवढे रंगमंचावर घडते. त्यापेक्षा जास्त ते पाठीमागे घडते. पूर्ण बॅकस्टेजच्या टीमची कसरत करणारे हे नाटक आहे. आता हे दोनशे प्रयोग म्हणजे जेवढ्या ह्या तिघांचे यश आहे, तेवढेच ह्यावर
बॅकस्टेजला काम करणा-या जवळ जवळ तीस जणांचे यश आहे.”
भारत गणेशपूरे नाटकाविषयी सांगतात,” मी पूर्वीचे नाटक पाहिले नाही. त्यामूळे नशीबाने त्या नाटकाशी ह्या नाटकाची काम करताना मी तुलना केली नाही. आणि टेन्शन न घेता काम करू शकलो. ह्या नाटकात फक्त अभिनय करायचा नाही, तर प्रेक्षकांशी संवादही करायचा असल्याने दरवेळी काही तरी नाविन्य अनुभवता येते.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसे झाले सागर कारंडेचे स्वप्न पूर्ण?