आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्व्हर स्क्रिनवरचे ‘लव्हबर्ड्स’ भेटले दोन वर्षांनी... पाहा, मुक्ता-स्वप्नील कुठे आले एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताला काहीतरी समजवून सांगताना स्वप्निल जोशी
‘मुंबई-पुणे-मुंबई’मधनं दिसलेली मुक्ता-स्वप्निलची जोडी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधनं दिसली आणि मुक्ता-स्वप्नीलच्या चाहत्यांना ही जोडी पून्हा पुन्हा पाहाविशी वाटू लागली. त्यानंतर दोघंही ‘मंगलाष्टका वन्स मोअर’मध्येही दिसले. पण आता त्यालाही दोन वर्ष पूर्ण झालीयत. आता स्वप्नील-मुक्ताचा नवा चित्रपट ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ यंदा रिलीज होतोच आहे. पण त्याअगोदर दोघंही पून्हा एकदा प्रेक्षकांना दिसली ती, गिरीश जोशी लिखीत दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ ह्या सस्पेन्स थ्रिलर नाटकाच्या ५० प्रयोगांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला, त्यावेळी.
‘लव्हबर्ड्स’ने अर्धशतक गाठल्याच्या निमीत्ताने निर्माती आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेचा जवळचा मित्र आणि अभिनेता स्वप्नील जोशीसह अभिजीत गुरू, समिधा गुरू, अमृता संत, संग्राम साळवी, अदिती सारंगधर हे नाट्य-सिनेसृष्टीतील कलावंत उपस्थित होते.
गिरीश जोशी यांनी १९९१ला लिहीलेले हे नाटकं, २५ एप्रिल २०१५ला तिस-यांदा रंगभूमीवर आलंय. १९९१ला पहिल्यांदा विनय आपटे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं. त्यानंतर २०११ला दुस-यांदा आणि आता २०१५ला मुक्ता बर्वे, विद्याधर जोशी यांच्यासह तिस-यांदा हे नाटक रंगमंचावर आलंय. आणि तिस-यांदाही या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. तीन महिने होण्याच्या आधीच नाटकाने ५० प्रयोग पूर्ण केलेत. त्यामुळे ‘लव्हबर्ड्स’च्या टीममध्ये साहजिकच उत्साह होता.
लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी याविषयी सांगतात, “हे नाटक काळानुरूप बदलतं गेलेलं नाटकं आहे. ज्याप्रमाणे सीसीटीव्ही आणि मोबाइल्स आले. त्याप्रमाणे मल्टीमिडीयाचा वापर यात केला.आणि त्यामुळे नाटक अधिक खुलायला मदत झाली.”
गिरीश जोशी हे सांगत असताना ग्रीनरूममध्ये समोरच आपल्या एन्ट्रीची तयारी करत असलेले विद्याधर जोशी म्हणाले, “आम्हांला तर गेल्या अडीच महिन्यांत अशीही लोकं भेटतात, की ज्यांना नाटक एकदा आवडलं तर पून्हा दुस-यांदाही ते पाहायला येतात. एक माणूस नुकताच पार्ल्याच्या दिनानाथ मंगेशकरला प्रयोग पाह्यला आला. आणि लागोपाठ दुस-या दिवशी गडकरीला प्रयोग होता. तिथेही आला. सपेन्स नाटकाला पुन: प्रत्यय घेणारा प्रेक्षक मिळतोच असं काही नाही. पण ह्या नाटकाला जो प्रतिसाद मिळतोय. त्याप्रमाणे नाटकाचे आता सहज १००० प्रयोग होऊ शकतात. अगदी दहा हजार झाले तरीही आश्चर्य वाटायला नको.”
नाटकाची निर्माती, अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते,“तिस-यांदा रंगभूमीवर आलेल्या एखाद्या नाटकाने एवढ्या कमी वेळात एवढे जास्त प्रयोग करणं हे केवळ प्रेक्षकांच्या प्रतिसादानेच घडतंय. आम्हांला कलावंतासह तंत्रज्ञांचा एवढा चांगला पाठिंबा मिळाला, त्यामुळेच हे घडतंय. अनेकजण आहेत, ज्यांनी पहिल्यांदा १९९१ला जेव्हा नाटक रंगभूमीवर आलं, तेव्हा पाहिलं होतं. आणि आता २०१५ला पून्हा रंगभूमीवर आलं तेव्हाही पाहतायत. ही संहिता लोकांना बांधून ठेवू शकतेय. आणि नाटक कालातीत आहे, हेच ह्यावरून सिध्द होतं.”
स्वप्निलला मुद्दामहून मुक्ताने नाटकाला बोलावलं. आणि आपल्या जीवलग मैत्रिणीसाठी स्वप्निलही आला. आणि नाटक पाहिल्यानंतर तो एकदम गहिवरूनच गेला होता.
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का गहिवरला स्वप्नील जोशी