आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पृहा जोशी-चिन्मयने मारली सेंच्युरी, पाहा, कसं झालं \'समुद्र\'च्या शतकपूर्तीचे सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकपूर्तीचे सेलिब्रेशन
भद्रकाली प्रॉडक्शनची पन्नासावी नाट्यकृती असलेल्या ‘समुद्र’ ह्या नाटकाचे शंभर प्रयोग नुकतेच पूर्ण झाले. त्यावेळी नाट्यकलावंतांनी शतकपूर्तीचा आनंद आपल्या जवळच्या कलावंत मित्रांसह केक कापून साजरा केला. निर्माता प्रसाद कांबळी, लेखक-दिग्दर्शक-अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी ह्यांच्यासह ह्या नाटकाचे कलावंत आणि अजित भूरे, राजन भिसे, मंगेश बोरगांवकर, अभिनेत्री सुरभी हांडे हे सेलिब्रिटी ह्या नाटकाच्या शतकपूर्तीनिमीत्त झालेल्या छोटेखानी सेलिब्रेशनला उपस्थित होते.
२५ डिसेंबर २०१४ला रंगभूमीवर आलेलं हे नाटकं लेखक मिलींद बोकील ह्यांच्या ‘समुद्र’ ह्या कादंबरीवर आधारित आहे. ‘समुद्र’चं नाट्यरूपांतर चिन्मय मांडलेकरने केले आहे. चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी ही दोनचं पात्र ह्या नाटकात आहेत. मुलगा मोठा झाल्यानंतर अचानक काही कारणांनी नाजूक वळणावर पोहोचलेल्या पती-पत्नीच्या नातेसंबंधाविषयी हे नाटक आहे.
शतकपूर्ती निमीत्ताने नॉस्टेलजिक होत अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाली,”समुद्र ही कादंबरी मी तीन वर्षांपूर्वी वाचली. आणि त्याचवेळी चिन्मयला म्हटले की, ह्यावर एक सुंदर नाटक होऊ शकतं. आणि त्यानंतर तो विषय खरं तर तिथेच संपला. पण अचानक गेल्या डिसेंबरमध्ये चिन्मय आणि प्रसाद हे नाटक घेऊन माझ्याकडे आले, आणि त्यात अभिनय करणं माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून समृध्द करणारा अनुभव होता. अशा नाटकाचे शंभर प्रयोग होणं, खूप कठीण होतं. व्यावसायिक गणितात बसणारं हे नाटक नाही. तरीही लोकांना आज ते आवडतंय. आणि शतक पूर्ण करतंय, ही एक खूप मोठी गोष्ट आहे.”
निर्माता प्रसाद कांबळी आपल्या पन्नासाव्या नाट्यकृतीच्या शतकपूर्तीबद्दल सांगतो, “समुद्र हे नाटक आमचं पन्नासाव्व नाटकं योगायोगाने झालं. हेच नाटक पन्नासावे असावे, असं काही नाटक करताना ठरवलं नव्हतं. खरं तर, चिन्मय आणि मी एक दूसरंच नाटक करतं होतं. पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही, तेव्हा चिन्मयने मला समुद्र बद्दल सांगितले. ताबडतोब मी कादंबरी वाचली. मी आणि चिन्मय दोघंही मिलींद बोकीलांकडे गेलो. त्यांची परवानगी घेऊन नाटक चिन्मयने लिहिले. दिग्दर्शित केले. आणि ते रंगभूमीवर आले. ही सगळी गोष्ट फक्त एका महिन्यात घडली. नाटकाची फक्त १५ दिवसच तालीम झाली असेल. नाटक रंगभूमीवर आले, अनेकांनी हा धाडसी प्रयोग असल्याचे सांगितले. पण गेले शंभर प्रयोग प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा आम्हांला भरभरून प्रतिसाद मिळाला. पुरस्कार मिळाले. हे खरंच सुखावह आहे.”
(फोटो- अजित रेडेकर)
पूढील स्लाइडमध्ये वाचा, चिन्मयला कशी आली स्पहाने सागितलेल्या कादंबरीची आठवण?