आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location : \'100 डेज\'चे झाले पॅकअप, तेजस्विनी म्हणते, So Happy With My Work

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या नजरेच्या जाळ्यात समोरच्या व्यक्तीला सहजपणे अडकवणा-या एका तरुणीची आणि कोणत्याच मोहात न अडकणा-या एका प्रामाणिक पोलीस अधिका-याची उत्कंठावर्धक मालिका '100 डेज' आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेत राणी सरदेसाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शूटिंग सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन मालिकेचे पॅकअप झाल्याचे सांगितले. फोटो शेअर करताना तेजस्विनीने लिहिले, ''#PackUpWithBackUp It was great experience with you all #myteam #100days #LoveYouAll #SoHappyWithMyWork''  
 
शीर्षकाप्रमाणेच ही मालिका केवळ 100 भागांची आहे. 17 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून या मालिकेची जागा आता 'दिल दोस्ती दोबारा' ही मालिका घेणार आहे. कोणतीही मराठी मालिका ठरावीक भागांची असण्याची ही छोट्या पडद्यावरची पहिलीच वेळ आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना खूपच आवडली. या मालिकेची निर्मिती संतोष अयाचित आणि सुनील भोसले यांची आहे. '100 डेज' या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण त्याचसोबत या मालिकेतील तेजस्विनीचा लूक प्रेक्षकांना आवडला. मागील वर्षी 24 ऑक्टोबर रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून बघायला मिळला. तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे यांच्यासह मालिकेत रमेश भाटकर, अर्चना निपाणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, या मालिकेचे निवडक ऑन लोकेशन फोटोज...  

 
बातम्या आणखी आहेत...