आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Serial Dil Dosti Duniyadari Will End Soon

\'दिली दोस्ती दुनियादारी\' लवकरच घेणारेय प्रेक्षकांचा निरोप, ब्रेकनंतर येणार सिझन 2

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी आम्ही एक खास बातमी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारेय. येत्या 28 फेब्रुवारी रोजी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणारेय. आश्चर्यचकित झालात ना. अगदी हाय पॉईंटवर असताना अचानक निर्मात्यांनी मालिका बंद करण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल ना... बरोबरच आहे, म्हणा. ‘कैवल्य’, आशू’, ‘सुजय’, ‘अ‍ॅना’, ‘रेश्मा’, ‘मीनल’ माजघरातील हे सर्व मित्र अचानक आपल्याला भेटणार नाही म्हटल्यावर थोडं टेंशन येणं स्वाभाविकच आहे. पण निराश होऊ नका. हा निरोप कायमचा नसून अल्पविराम आहे. एका ब्रेकनंतर मालिकेचे दुसरे पर्व घेऊन हीच मंडळीपुन्हा एकदा आपल्या भेटीस येणारेय.
28 जानेवारी रोजी डोंबिवलीत झालेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी'चा कॉन्सर्टमध्ये ‘कैवल्य’, आशू’, ‘सुजय’, ‘अ‍ॅना’, ‘रेश्मा’, ‘मीनल’ यांनी ही घोषणा केली. मालिका बंद होणार असल्याची घोषणा होताच उपस्थित तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्षणभर शांतता पसरली. पण त्यानंतर लगचेच ‘हा अल्पविराम आहे, आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत, असे जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट आणि शिटय़ांच्या आवाजात याचे उपस्थितांकडून स्वागत झाले. 28 जानेवारी रोजी झालेली कॉन्सर्ट येत्या 21 फेब्रुवारीला ऑन एअर जाणारेय.
ही मालिका सध्या कमालीची लोकप्रिय असून मालिकेतील मालिकेतील सर्व पात्रांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिकेला चांगला टीआरपी असताना, मालिका बंद का होतेय, याचा उलगडा करण्यासाठी आम्ही मालिकेचे निर्माते संजय जाधव यांच्याशी संवाद साधला. काय म्हणाले, संजय जाधव जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...