आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'घाडगे & सून' मालिकेने पूर्ण केले 100 एपिसोड्स, कलाकारांनी जल्लोष करत केले सेलिब्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'घाडगे & सून' ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट अभिनय, आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या माईना म्हणजेच सुकन्या कुलकर्णी यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, तसेच चिन्मय उदगीरकर याचा सहज अभिनय, अतिशा नाईक यांचे खोचक बोलणारे वसुधाचे पात्र, तसेच भाग्यश्री लिमये जिची ही पहिलीच मालिका आहे तिने देखील आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचबरोबर  मालिकेमधील इतर सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून १०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेच्या लेखिका–अश्विनी शेंडे  आणि अरुणा जोगळेकर, दिग्दर्शक तसेच निर्माते जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे आणि सुकन्या कुलकर्णी, अतिशा नाईक, मंजुषा गोडसे, उदय सबनीस, चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये, संदीप गायकवाड, स्वाती लिमये या कलाकारांचा समावेश आहे.

 

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला, कलाकारांना झालेला आनंद त्यांच्या सेल्फीमधून दिसतो आहे. मालिकेचा नायक आणि आपल्या सगळ्यांचाच लाडका चिन्मय उदगीरकर याने सेटवर स्पेशली केक आणला आणि तो मालिकेच्या सगळ्या टेक्नीकल टीमकडून कट करून घेतला, हे खरोखच कौतुकास्पद आहे. केक कट करताना मालिकेचे शीर्षक गीत सगळ्यांनी मिळून म्हटले.

 

यावर बोलताना चिन्मयने सांगितले, 'घाडगे & सून' मालिकेचे गेल्या दोन आठवड्यामध्ये सलग एका तासाचे भाग प्रक्षेपित झाले. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. स्पॉट दादा, टेक्नीकल टीम, आमचे दिग्दर्शक या सगळ्यांनी हे शिवधनुष्य खूप छान पेलले. आम्ही कलाकार प्रेक्षकांना रोज भेटतो पण, हे पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत जे दिवस रात्र मेहेनत घेतात त्यांचे कौतुक, सत्कार हा झाला पाहिजे असं मला वाटले. त्यांना जेंव्हा कळालं कि आज आमचे १०० भाग पूर्ण झाले आहेत तेंव्हा त्यांना देखील खूप आनंद झाला. तसेही आम्ही आमच्या सेटवर सेलिब्रेशनचा एकही मोका सोडत नाही”. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'घाडगे & सून' मालिकेच्या 100 एपिसोड पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेशनचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...