आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिने कैदेत होती ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली होती सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः सुप्रिया पाठारे... मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. विनोदी भूमिका असो वा गंभीर, प्रत्येक भूमिकेला सुप्रिया यांनी न्याय दिला आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेतील कांचनमालाबाईंच्या निगेटिव्ह भूमिका आणि 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्रीची मोठी आई या भूमिकेतून सुप्रिया अलीकडच्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता या मालिकानंतर त्या प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला सज्ज झाल्या आहेत. 14 ऑगस्टपासून 'जागो मोहन प्यारे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुप्रिया यांच्यासोबत अतुल परचुरे आणि श्रुती मराठे या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. सुप्रिया आणि अतुल परचुरे मालिकेत पती-पत्नीच्या भूमिकेत असून श्रुतीने जिनीची भूमिका वठवली आहे. 
 
मालिकेत सामान्य गृहिणीची भूमिका वठवणा-या सुप्रिया यांना एकदा त्यांच्या खासगी आयुष्यात मोठ्या अडणीचा सामना करावा लागला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सुप्रिया मोठ्या संकटातून बाहेर पडल्या होत्या. काय घडले होते त्यांच्यासोबत यासह जाणून घेऊयात बरंच काही... 

 1995 साली आले होते मोठे संकट.. 
- एका निर्मात्याने मला तीन महिने डांबून ठेवले होते मात्र दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर माझी सुटका झाल्याचे सुप्रिया पाठारे यांनी एका कार्यक्रमात उघड केले होते. 
- सुप्रिया यांनी त्यावेळी त्यांच्यासोबत नेमके काय घडले होते ते सांगितले होते. सुप्रिया म्हणाल्या होत्या, "1995 मध्ये एक चित्रपट निर्मात्याने मला चित्रीकरणासाठी राजस्थानला नेले व तिथे मला त्याने तीन महिने डांबून ठेवले होते. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातून मी एकटीच होते. पुढील तीन महिने निर्मात्याने बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून अभिनय करवून घेतला. मला तिथल्याच परिसरात डांबले होते."
 
पुढे वाचा, निर्मात्याने मराठीत न बोलण्याचा दिला होता दम... 
बातम्या आणखी आहेत...