आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिव'ची 'गौरी' प्रत्यक्षात आहे Hot & Glamours, जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी मुलगी आणि हिंदी भाषिक तरुणाची प्रेमकहाणी असलेली 'काहे दिया परदेस' ही मालिका लवकरच आपला निरोप घेणार आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून 24 सप्टेंबर पासून डॉ. अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेली संभाजी ही मालिका रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
प्रेमाला कुठल्याच सीमा नसतात, ही थीम घेऊन दोन संस्कृतींचा मिलाफ दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून केला होता. कालांतराने त्यात सासू-सून मतभेद, कट-कारस्थानं, गैरसमज, ताणतणाव, धक्के हे सगळं ओघाने आलेच. पण आता सगळी दुरावलेली नाती, झाले गेले गंगेला वाहून पुन्हा जवळ येऊ लागली आहेत. गौरीला जुळी मुलं होणार असल्याची खुशखबरही मिळाल्यानं, मुलगा की मुलगी हा वादही दिग्दर्शकाने खुबीने निकाली काढलाय. मालिकेची वाटचाल गोड शेवटाकडे सुरू आहे. त्यामुळे आता गौरीची डिलिव्हरी झाली की, सावंत आणि शुक्ल परिवार एकत्र येऊन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरु झालेली काहे दिया परदेस ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. गौरी आणि शिव घराघरांतील अविभाज्य भाग बनले. या मालिकेत अभिनेत्री सायली संजीवने गौरी तर ऋषी सक्सेना या हिंदी कलाकाराने शिवची भूमिका वठवली.  
मालिकेत अतिशय साधी दिसणारी सायली खासगी आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे.
 
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सायली संजीवचा रिअल लाईफमधील ग्लॅमरस लूक तर दाखवतोयच सोबतच तिच्याविषयीचीसुद्धा बरीच माहिती तुम्हाला वाचता येईल.

चला तर मग मुळची कुठली आहे सायली, किती शिकलीये, कशाकशाची तिला आवड आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...