आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: शीतली-अज्याच्या \'लागिर झालं जी\' मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण, असे झाले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या शूरवीरांना मानवंदना देणारी, वीरांचा गौरव करणारी ‘लागिरं झालं जी’ या मालिकेचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे पासून छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या या मालिकेने अल्पावधतीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असून शीतली, अज्या, राहुल, विक्या हे पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. मालिकेने 100 भागांचा यशस्वी टप्पा गाठल्याच्या निमित्ताने मालिकेची निर्माती शिल्पा शिंदेने सेटवर कलाकारांसोबत केक कापून हा आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचे खास फोटोज कलाकारांनी सोशल मीडियावरसुद्धा शेअर केले आहेत.    

सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख म्हणजे सैनिकांचा जिल्हा. साताऱ्यातल्या बहुतांश घरातून एखादा मुलगा तरी सैन्यात असतोच. अशा या सातारा जिल्ह्यातल्या चांदवडी गावातला एक मुलगा म्हणजे अजिंक्य शिंदे आणि पवार कुटुंबातील लाडकी लेक शीतल या दोन व्यक्तिरेखांभोवती मालिकेची कथा गुंफण्यात आली आहे. 

या मालिकेत अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आणि शीतलच्या भूमिकेत शिवानी बोरकर हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. श्वेता शिंदे आणि संजय कांबळे यांच्या वज्रा प्रॉडकशन्स निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन संजय कांबळे यांनीच केले आहे. तेजपाल वाघ यांनी ही मालिका लिहिली असून मालिकेचे बहुतांश चित्रीकरण हे साताऱ्यात होतंय. या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत.

पाहुयात, मालिकेच्या सेटवर कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनची खास झलक छायाचित्रांमध्ये... 
बातम्या आणखी आहेत...