आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It's Party Time : ‘लक्ष्य’चे 700 भाग पूर्ण, पत्नीसोबत थिरकले आदेश बांदेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी सुचित्रा आणि मालिकेच्या टीमसोबत थिरकताना आदेश बांदेकर)

'लक्ष्य मालिकेला मिळालेले यश हे मालिकेशी संबंधित प्रत्येक सदस्याचे आहे. एक नवी टीम घेऊन मालिका सुरु होणे आणि बघता बघता तिने लोकप्रियतेचे शिखर गाठत 700 भाग पूर्ण करणे, हे सांघिक यश आहे. म्हणूनच आज हे यश साजरे करण्यासाठी कोणी सेलिब्रेटी, प्रमुख पाहुणा न बोलवता तुम्ही सगळेच आजच्या सोहळ्याचे नायक आहात’, अशा शब्दांत निर्माते आदेश बांदेकर-सुचित्रा बांदेकर यांनी 'लक्ष्य' मालिकेच्या टीमचे आभार मानले.
निमित्त होते छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'सोहम प्रॉडक्‍शन'च्या ‘लक्ष्य’ या मालिकेने 700 भाग पूर्ण केल्याबद्दल अंधेरीच्या ‘सॅफ्रोन स्पाईस’ इथे संपन्न झालेल्या जल्लोष सोहळ्याचे. यावेळी निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनीही संपूर्ण टीमच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा, त्यांच्या निर्मिती सहभागातल्या आठवणीना उजाळा देत हा कार्यक्रम संस्मरणीय केला.
या आगळ्या वेगळ्या संकल्पनेनुसार संपूर्ण टीमच्या कुटुंबीयांनाही या जल्लोषात सहभागी करून घेण्यात आले. या अनोख्या कौतुकाने कलाकार- तंत्रज्ञ भारावून गेले होते. या जल्लोष सोहळ्यात आदेश बांदेकर पत्नी सुप्रियासोबत थिरकतानाही दिसले.
या मालिकेत आता अधिक उत्कंठावर्धक कथा आणि मालिकेतल्या सगळ्याच लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणणारे भाग लवकरच पाहायला मिळतील अशी घोषणा यावेळी निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी केली. या सोहळ्याला अशोक समर्थ, श्वेता शिंदे, आदिती सारंगधर, जगन्नाथ निवानगुणे, कमलेश सावंत, रमेश वाणी, परी तेलंग, धनश्री क्षीरसागर हे कलाकार उपस्थित होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'लक्ष्य'च्या जल्लोष सोहळ्याची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...