आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: 'लव्ह लग्न लोचा'मध्ये होतोय सर्वात मोठा लव्ह लोचा!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे. राघव, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांशा आणि सौम्या ह्या मालिकावीरांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजच्या तरुणाईच्या हृदयात घरं केली आहेत. ज्या प्रमाणे या मालिकेत अभिमान-शाल्मली, विनय-आकांशा, सुमित-सौम्या अशा जोड्या होत्या तिथे केवळ राघव आणि काव्या हे दोघेच "Singal Status " घेऊन होते. मात्र हळूहळू यांच्या दोघांमध्ये सुद्धा हल्लीच्या काही एपिसोड्स मध्ये भावनिक गुंतवणूक दिसत होती.

राघव म्हणजेच विवेक सांगळे आणि काव्या म्हणजेच रुचिता जाधव जे आधी एकमेकांशी नुसते भांडायचे ते मात्र एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. राघवच्या होणाऱ्या डान्सच्या भव्य कार्यक्रमात राघव आणि काव्याचे नाते जुळणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करत असतानाच या दोघांचे एकमेकांवरील प्रेम एकमेकांना समजू लागले होते आणि या कार्यक्रमात हे दोघे एकत्र एक उत्कृष्ट डान्स सादर करणार आहेत. राघव आणि काव्याच्या या नात्यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. पण त्याच बरोबर सुमित म्हणजेच ओंकार गोवर्धन आणि सौम्या म्हणजेच अक्षया गुरवचे नाते मात्र कायमचे तुटणार आहे. आता हा लोचा का आणि कसा होणार आहे हे  या मालिकेच्या  या आठवड्यातील भागांमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल.  
 
पुढील 4 स्लाईड्सवर बघा, राघव-काव्याच्या डान्स परफॉर्मन्सची छोटीशी झलक...
बातम्या आणखी आहेत...