आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चला हवा येऊ द्या'मध्ये रंगणार रात्रीचा खेळ, थुकरटवाडीची मंडळी पोहोचली नाईकांच्या वाड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील नाईकांच्या वाड्यात आजवर गुढ आणि रहस्यमय गोष्टीच घडत होत्या. पण आता इथे हास्यकल्लोळ उडणार आहे कारण थुकरटवाडीची मंडळी या वाड्यावर येणार आहे आणि नाईक कुटुंबाला आपल्या मंचावर घेऊन जाणार आहेत. यासाठी कारणही तसंच खास आहे ते म्हणजे दसरा सणाचं. दस-याच्या निमित्ताने 'चला हवा येऊ द्या'मध्ये रंगणार आहेत दोन विशेष भाग.

सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागात या दोन्ही टीमची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. गोव्यातील मडगाव येथे या खास भागाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. शिवाय कोकणातील आकेरी गावात असलेल्या नाईकांच्या वाड्यावरसुद्धा 'चला हवा येऊ द्या'च्या मंडळीने जाऊन एकच धम्माल उडवून दिली होती. ही सर्व धमाल आज (10 ऑक्टोबर) आणि उद्या (11 ऑक्टोबर) रात्री 9.30 वा. झी मराठीवर बघता येईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, थुकरवाडीत रंगलेल्या रात्रीच्या खेळाची खास क्षणचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...