आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: बघा 'श्रावणबाळ रॉकस्टार'ची दिवाळी मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः झी युवा या वाहिनीवरील 'श्रावणबाळ रॉक स्टार' या मालिकेच्या सेटवर नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली. यात बऱ्याच कलाकारांचे नवनवे कलागुण दिसून आले. केतकी म्हणजेच कामिनी ही सुंदर अभिनेत्री, उत्तम कलाकार आहे, हे आपल्या सर्वानाच माहित आहे. ती उत्तम नाचते हेसुद्धा जगजाहीर आहे, पण ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. सेटवर सर्वांबरोबर मस्ती करताना तिने सुंदर गाणंही गायले. त्याचप्रमाणे संचिता म्हणजेच नितू ही अतिशय उत्तम मिमिक्री करते. तिने डोरेमॉन नामक कार्टूनमधील नोबेतो या कॅरेक्टरचा हुबेहूब आवाज काढत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील नीरज गोस्वामी, केतकी पालव, संचित कुलकर्णी, राजेश देशपांडे, सुप्रिया विनोद, आशिष कापिसकर पार्थ घाटगे आणि जयवंत वाडकर हे सर्वच कलाकार उपस्थित होते. झी युवाच्या या सर्वच कलाकारांनी सर्वांना इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचं आवाहन केले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मालिकेच्या सेटवर झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे खास Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...