आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणाने अंजलीबाईंना शिकवली बुलेट, बघा, \'तुझ्यात जीव रंगला\'च्या सेटवरचे खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागात अंजली बुलेट चालवायला शिकली. अंजलीने बुलेट चालवावी, अशी राणाची इच्छा असते. अंजलीसुद्धा राणाची इच्छा पूर्ण करत बुलेट चालवायला शिकते. विशेष म्हणजे अंजली बुलेट चालवायला शिकली म्हणून सगळ्यांनी तिचे कौतुक केले. नंदिताची पाठराखीण चंदानेसुद्धा अंजलीचे कौतुक करते. त्यामुळे नंदिताचा चांगलाच तीळपापड होतो. नंदिताही तिचा नवरा सूरजकडे बुलेट चालवण्याची इच्छा व्यक्त करते. पण तुला बुलेट चालवणे झेपणार नाही, असे सूरज तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण नंदिताच्या हेकेखोरपणामुळे तो वैतागतो आणि निघून जातो. नंदिता काहीही करुन बुलेट चालवायचे ठरवते. ती राणाकडून त्याच्या बुलेटची चावी घेतली आणि बुलेट चालवण्याचा प्रयत्न केला. पण नंदिता बुलेट घेऊन पडते आणि तिला चांगलाच मार लागतो. अंजलीसोबत स्पर्धा करु नको, ती या घराण्याची थोरली सून आहे, असे मामांजी नंदिताला खडसावून सांगतात. त्यामुळे आता नंदिता या अपमानाचा कसा बदला घेईल, हे मालिकेच्या येणा-या भागांत बघणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे. 

पाहुयात, या मालिकेच्या सेटवर क्लिक झालेले अंजलीबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधरचे तिच्या सहकलाका-यांसोबतचे खास फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...